Edible Oil : सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा, खाद्यतेलाचे भाव उतरले..

Edible Oil : खाद्यातेलाचे दर भडकले नाही तर , स्वस्त झाले आहे..

Edible Oil : सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा, खाद्यतेलाचे भाव उतरले..
खाद्यतेलाच्या किंमती उतरल्याImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 6:21 PM

नवी दिल्ली : डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयाने (Rupees) मोठी मजल मारल्याचा परिणात तात्काळ दिसत आहे. मजबूत रुपयामुळे खाद्यतेलाचे दर (Edible Oil Rate) घसरले आहेत. गेल्या काही दिवसातच हा बदल दिसून आला. आता त्याचा फायदा जनतेला लवकरच मिळेल. या घसरणीमुळे महिन्याचे बजेट (Budget) कमी होण्याची आशा आहे.

दिल्लीतील खाद्य तेल बाजारात ही घसरण दिसून आली. तिळाचे, पामतेल, पामोलीन तेलाच्या किंमतीत घसरण झाली. तर सोयाबीन, सूर्यफूल यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. बाजारात या दोन्ही तेलबियांच्या तुटवड्यामुळे ही परिस्थिती उद्धभवल्याचा दावा करण्यात येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपया सध्या मजबूत स्थितीत आहे. परिणामी, पाम, पामोलीन सारख्या आयात तेलांचा दर घसरला आहे. गेल्या आठवड्यातच हा परिणाम दिसून आला. त्याचा फायदा ग्राहकांना लवकरच होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या आठवड्याच्या अखेरीस हा बदल दिसून आला. सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किमतीत घट नोंदविण्यात आली. तर स्थानिक तेलबिया वर्गीय पिकांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यांच्या निर्यातीच्या धोरणाचाही परिणाम झाला. बाजारात सोयाबीन, तिळ आणि सूर्यफूलाचा तुटवडा आला.

तज्ज्ञांच्या मते गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात सोयाबीन जवळपास 10,000 रुपये प्रति क्विंटल भावाने विक्री केले होते. सध्या सोयाबीन 5,500-5,600 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. हा शेतकऱ्यांना एक प्रकारे फटका समजल्या जातो.

किमान आधारभूत किंमतींपेक्षा (MSP), हमी भावापेक्षा सध्या सोयाबीनला अधिक दर देण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत हे भाव अत्यंत कमी आहे. यंदा शेतकऱ्यांना बियाणे महाग मिळाले होते.

आता या सर्वांचा परिणाम अर्थातच रिफाईंड तेलावर पडणार आहे. रिफाईंड तेलाचे दर घसरणार आहेत. तर सोयाबीनच्या किंमती अजून कमी झालेल्या नाहीत. शेतकरी जोपर्यंत बाजारात साठा आणत नाही. तोपर्यंत तेलाचे भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे.

शेंगदाणा तेल आणि कापासाच्या बियांचे तेलाचे दर घसरले आहेत. येत्या काही दिवसात बाजारात या तेलबिया येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बाजारातील साठ्यावर होणार आहे. त्यामुळे तेलाची आवक वाढवून स्वस्ताई येऊ शकते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.