Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Elon Musk : एका झटक्यात गमावले मस्क बाबाने 10,35,03,83,40,000 रुपये!

Elon Musk : कमाईसाठी ब्लू टिक काढण्याचा वादळी निर्णय घेणाऱ्या एलॉन मस्क यांना गुरुवार काही पावला नाही. त्यांना एका झटक्यात 10,35,03,83,40,000 कोटींचा फटका बसला, यामागचं कारण तरी काय..

Elon Musk : एका झटक्यात गमावले मस्क बाबाने 10,35,03,83,40,000 रुपये!
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 10:14 AM

नवी दिल्ली : टेस्ला (Tesla), स्पेसएक्स (SpaceX) आणि ट्विटरचे (Twitter) सीईओ एलॉन मस्कला (Elon Musk) गुरुवार काही पावला नाही. त्यांची स्पेस कंपनी स्पेसएक्सचे रॉकेट आकाशाकडे झेपावल्यानंतर काही मिनिटातच फेल झाले. इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या मस्क यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. गुरुवारी जवळपास 10 टक्के घसरण झाली. मस्क यांनी 12.6 अब्ज डॉलर गमावले. त्यांनी 10,35,03,83,40,000 रुपये गमावले. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार, मस्क यांची नेटवर्थ आता 164 अब्ज डॉलर आहे. यावर्षी त्यांच्या एकूण संपत्तीत 26.8 अब्ज डॉलरची भर पडली होती. सध्या मस्क हे जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. तर सर्वाधिक कमाई करणाऱ्या उद्योजकात तिसऱ्या स्थानावर आहेत.

मेटाची टेस्लावर मात टेस्लाच्या शेअरमध्ये गुरुवारी 9.75 टक्क्यांची घसरण झाली. टेस्लाचे बाजार मूल्य 516.56 अब्ज डॉलर उरले आहे. या पडझडीमुळे ही कंपनी आता एक पायरी खाली घसरली आहे. टेस्ला कंपनी दहाव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर आली आहे. मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांची कंपनी मेटा प्लेटफॉर्म (Meta Platforms) टेस्लापेक्षा एक पाऊल पुढे सरकली आहे. आयफोन तयार करणारी ॲपल (Apple) 2.636 ट्रिलियन डॉलरसह या जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. या यादीत मायक्रोस्फॉट दुसऱ्या, अरामको तिसऱ्या, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट चौथ्या तर ॲमेझॉन पाचव्या स्थानावर आहे.

अंबानी-अडाणी यांचा क्रमांक कितवा या यादीत फ्रान्सचे बर्नार्ड ऑरनॉल्ट (Bernard Arnault) 211 अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह जगातील पहिले अब्जाधीस ठरले. जेफ बेजोस 128 अब्ज डॉलरसह तिसऱ्या, बिट गेट्स (122 अब्ज डॉलर) चौथ्या, वॉरेन बफे (114 अब्ज डॉलर) पाचव्या, लॅरी एलिसन (107 अब्ज डॉलर) सहाव्या क्रमांकावर, स्टीव्ह बामर (101 अब्ज डॉलर) सातव्या, लॅरी पेज (97.5 अब्ज डॉलर) आठव्या, फासुआ बेटनकोर्ट मायर्स (93.3 अब्ज डॉलर) नवव्या, सर्गेई ब्रिन (93.3 अब्ज डॉलर) दहाव्या स्थानावर आहेत. तर मुकेश अंबानी (81 अब्ज डॉलर) 12 व्या क्रमांकावर, गौतम अदानी (59.1 अब्ज डॉलर) 21 व्या स्थानावर आहेत. गुरुवारी अंबानी यांच्या एकूण संपत्तीत 13.2 कोटी डॉलरची घसरण आली. तर अदानी यांच्या एकूण संपत्तीत 26.6 कोटी डॉलरची भर पडली.

हे सुद्धा वाचा

डोक्याला झाला ताप जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) याला ट्विटर खरेदीचा कोण पश्चाताप झाला. ट्विटर खरेदीचा डोक्याला ताप झाल्याचा दावा मस्क याने केला आहे. आपल्या अतरंगी स्वभावासाठी मस्क ओळखण्यात येतात. ट्विटर (Twitter) खरेदी केल्यापासून आपले सूख हिरवल्याची भावना त्याने व्यक्त केली. मस्क याच्या दाव्यानुसार, ट्विटर खरेदीनंतर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही खरेदी डोक्याला ताप देणारी ठरली. ट्विटर कंटाळवाणे नसले तरी ते एका रोलकोस्टर राईडसारखे असल्याचा मस्कने दावा केला.

मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.