Repo Rate : रेपो रेट’ वाढीचा मार्केटला धसका, सेन्सेक्स 1307 अंकांनी घसरला; 6.1 लाख कोटींवर पाणी

| Updated on: May 04, 2022 | 6:53 PM

सेन्सेक्स 1307 अंकांच्या घसरणीसह 55,669 वर बंद झाला आणि निफ्टी 391 अंकांच्या घसरणीसह 16778 वर बंद झाला. शेअर बाजारात चौफेर घसरण नोंदविली गेली. रिझर्व्ह बँकेने रेपो दर (REPO RATE) फेररचने संबंधित केलेल्या घोषणेमुळे बाजारात घसरण दिसून आली.

Repo Rate : रेपो रेट’ वाढीचा मार्केटला धसका, सेन्सेक्स 1307 अंकांनी घसरला; 6.1 लाख कोटींवर पाणी
रिझर्व्ह बँक
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढीच्या घोषणेचा शेअर बाजारावर (SHARE MARKET) परिणाम दिसून आला. आज (बुधवारी) प्रमुख निर्देशांक (MAJOR INDEX) दोन टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. रिझर्व्ह बँकेने रेपो दर आणि सीआरआर मध्ये वाढीची घोषणा केली आहे. नियमित धोरण फेररचनेच्या व्यतिरिक्त रिझर्व्ह बँकेने बदलाची घोषणा केली आहे. सेन्सेक्स 1307 अंकांच्या घसरणीसह 55,669 वर बंद झाला आणि निफ्टी 391 अंकांच्या घसरणीसह 16778 वर बंद झाला. शेअर बाजारात चौफेर घसरण नोंदविली गेली. रिझर्व्ह बँकेने रेपो दर (REPO RATE) फेररचने संबंधित केलेल्या घोषणेमुळे बाजारात घसरण दिसून आली. तसेच प्रमुख स्टॉक्समध्ये शेअर विक्रीचे सत्र दिसून आलं. रिझर्व्ह बँकेने आज (बुधवारी) रेपो दरात 0.4 टक्के वाढीची घोषणा केली आहे.

रेपो ‘सर्जिकल’ स्ट्राईक-

रिझर्व्ह बँकेची फेररचनेचा सर्वांना अनेपक्षित धक्काच होता. एप्रिल नंतर जून महिन्यात फेररचनेचा आढावा घेतला जाणार होता. मात्र, तत्पपूर्वीच रिझर्व्ह बँकेने घोषणा केली आहे. टायटन शेअर्समध्ये चार टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सचे तीन टक्क्यांहून अधिक नुकसान झाले.

आजचे मार्केट ट्रॅकर-

आजच्या व्यवहारादरम्यान गुंतवणुकदारांना तब्बल 6.1 लाख कोटींवर पाणी सोडावं लागलं. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वर सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांचे बाजार मूल्य घटीसह 259.78 लाख कोटीवर पोहोचले आहे. गेल्या व्यवहार सत्रात आकडा 265.88 लाख कोटीवर पोहोचला होता. शेअर बाजारात आज चौफेर विक्रीचं सत्र दिसून आलं. सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 15 सेक्टरमधील 12 स्टॉक्स 2 टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.

हे सुद्धा वाचा

आजचे वधारणीचे शेअर्स-

· ओएनजीसी (3.27%)

· ब्रिटानिया (3.49%)

· पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन (2.61%)

· एनटीपीसी (0.73%)

· कोटक महिंद्रा (0.07%)

आजचे घसरणीचे शेअर्स-

· अपोलो हॉस्पिटल (-6.77%)

· अदानी पोर्ट्स (-5.11%)

· हिंदाल्को (-4.70%)

· बजाज फायनान्स (-4.32%)

· बजाज फिनसर्व्ह (-4.25%)