कितीही करा स्वस्ताईच्या घोषणा, महागाईने खिशावर घातला दरोडा; EMI कमी होण्याची दूर दूरवर शक्यता नाही

RBI Repo Rate : महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकला आहे. मध्यमवर्गाचे तर देशात सर्वाधिक मरण होत आहे. ईएमआयचे हप्ते, मुलांचे शिक्षण आणि वाढत्या महागाईत त्यांना कोणताच दिलासा मिळालेला नाही. करदाते असून सुद्धा त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

कितीही करा स्वस्ताईच्या घोषणा, महागाईने खिशावर घातला दरोडा; EMI कमी होण्याची दूर दूरवर शक्यता नाही
आरबीआय रेपो दर
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 4:48 PM

देशात महागाईचा तांडव सुरू आहे. किरकोळ महागाई दराचे (Consumer Price Index) आकडे ऑक्टोबर 2024 मध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे स्वस्त ईएमआयच्या ग्राहकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. देशातील किरकोळ महागाई दर आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वर गेला आहे. हा दर 6.21 टक्क्यांवर पोहचला आहे. डिसेंबर 2024 मध्ये आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कपातीची आशा माळवली आहे.

फेब्रुवारी 2025 मध्ये नाही होणार व्याजदर कपात

SBI रिसर्चने अहवाल दिला आहे. त्यात महागाई दरात आलेल्या तेजीच्या उसळीनंतर फेब्रुवारी 2025 मध्ये पण आरबीआयकडून रेपो दरात कपात होण्याची शक्यता फेटाळण्यात आली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (ShaktiKant Das) यांनी यापूर्वी अनेकदा व्याज दरात कपातीविषयीच्या धोरणाची माहिती दिली आहे. त्यानुसार, महागाई दर 4 टक्के निश्चित झाल्यावर केंद्रीय बँक व्याज दर कपातीचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

EMI मध्ये दिलासा नाही

मे 2022 मध्ये महागाई दर 7.80 टक्क्यांपर्यंत उसळी घेतल्यानंतर आरबीआयने रेपो दरात वाढीचा निर्णय घेतला. त्यानंतर झपाट्याने रेपो दर वाढला. पतधोरण समितीच्या पुढील 6 बैठकीत रेपो दरात 4 टक्क्यांहून वाढून फेब्रुवारी 2023 पर्यंत 6.50 टक्क्यांवर पोहचला. ऑगस्ट 2024 मध्ये महागाई दर कमी होऊन 3.65 टक्क्यांवर आला होता. तेव्हा आता रेपो दरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण ऑक्टोबरमधील आकडेवारीने या सर्व कसरतीवर पाणी फेरले आहे.

व्याज दर जैसे थे

RBI ने गेल्या 2 वर्षांत व्याज दरात कोणतीही कपात केलेली नाही. आरबीआयने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपो दर हा पूर्वीसारखाच 6.5 टक्के ठेवण्यात आला. त्यामुळे ईएमआयचा हप्ता कायम राहणार आहे. त्यामुळे कर्जदारांची निराशा झाली. आरबीआय गव्हर्नर यांनी व्याजदर जैसे थे राहण्याचे संकेत दिले आहे. आता पुढील पतधोरण समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.