Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar Card : व्यवहाराला ‘Aadhaar’ चा आधार! इतक्या कोटींच्या उलाढालीसाठी ई-केवायसीचा केला वापर..

Aadhaar Card : देशात सप्टेंबर महिन्यात झालेल्या उलाढालीत आधाराच आधार घेण्यात आला..

Aadhaar Card : व्यवहाराला 'Aadhaar' चा आधार! इतक्या कोटींच्या उलाढालीसाठी ई-केवायसीचा केला वापर..
Aadhaar CardImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 8:53 PM

नवी दिल्ली : देशात आधार कार्डचे (Aadhaar Card) महत्व नव्याने अधोरेखीत झाले. आतापर्यंत नागरिक (Citizen) त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आधार कार्ड वापरत करत आले आहेत. पण सार्वजनिक स्तरावर (public level) याचा काय उपयोग होतो हे समोर आलेले नव्हते. पण सप्टेंबर महिन्यातील एका आकडेवारीने आधारचे महत्व अधोरेखीत केले आहे.

सप्टेंबर महिन्यात आधार कार्डच्या मदतीने देशात ई-केवायसीच्या (e-KYC) माध्यमातून 25 कोटी रुपयांची उलाढाल करण्यात आली. ऑगस्ट महिन्यापेक्षा हे प्रमाण जवळपास 7.7 टक्के अधिक आहे.

e-KYC ही ग्राहकांच्या अनुमतीने करण्यात येते. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईनच या सुविधेचा वापर करता येतो आणि त्यांना कोणतीही कागदी कारवाई करावी लागत नाही. त्यामुळे व्यक्तिगत पडताळणीची आवश्यकता राहत नाही.

हे सुद्धा वाचा

याविषयी दिलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात 25.25 कोटी ई-केवायसीच्या मदताने आधारद्वारे व्यवहार पूर्ण करण्यात आले. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत हा आकडा जवळपास 7.7 टक्के अधिक आहे.

ई-केवायसी व्यवहारांची देशातील एकूण व्यवहाराची स्थितीही मोठी आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत आधारद्वारे ई-केवायसीच्या माध्यमातून आतापर्यंत 1,297.93 कोटींचे व्यवहार पूर्ण झाले आहेत.

आधारच्या माध्यमातून कार्यक्षम पेमेंट अदा प्रणाली (AEPS) ही आर्थिक क्रांतीसाठी महत्वपूर्ण ठरले आहे. एकूणच व्यवहाराची आकडेवारी पाहता ही बाब प्रकर्षाने समोर आलेली आहे.

देशातंर्गत AEPS आणि मायक्रो ATM च्या नेटवर्कद्वारे एकूण 1,549.84 कोटींचे व्यवहार पूर्ण करण्यात आले आहे. या सप्टेंबरपर्यंतची ही आकडेवारी आहे. यामुळे बँकिंग क्षेत्राला बळकटी मिळाली आहे.

सप्टेंबर महिन्यात 1.62 कोटी भारतीयांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट केले आहे. त्यांनी त्यांच्या आधार कार्डमधील माहिती अद्ययावत केली आहे. त्यात काहींच्या नावात, पत्त्यात वा इतर माहितीत दुरुस्ती करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात 1.46 कोटी लोकांनी माहिती अद्ययावत केली होती.

आतापर्यंत एकूण 66.63 कोटी आधार कार्ड अद्ययावत करण्यात आले आहे. केवळ नावातच बदल नाही तर या माध्यमातून बायोमॅट्रिक माहिती ही अपडेट करण्यात आली आहे.

भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.