मुंबई : भारताची मध्यवर्ती बँक असेलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) सेंट्रल बँक ऑफ इंडियाला (Central Bank of India)36 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत बोलताना आरबीआयच्या वतीने सांगण्यात आले की, सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 36 लाखांचा दंड (Fine) ठोठवण्यात आला आहे. याबाबत 18 एप्रिल 2022 रोजी आदेश जारी करण्यात आले आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून काही नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघ केल्याप्रकरणी आरबीआयच्या वतीने सेंट्रल बँक ऑफ इंडियाला दंड ठोठवण्यात आला आहे. बँकिंग रेग्युलेशन कायदा 1949 अंतरर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान ग्राहकांच्या सुरक्षेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. याचा कोणताही परिणाम हा ग्राहकांच्या व्यवहारांवर होणार नसल्याचे आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
आरबीआयकडून 31 मार्च 2020 ला आर्थिक स्थितीबाबत एक निरीक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये बँकेने ट्रांझेक्शन नियमांचे उल्लंघन केल्याची निर्दर्शनास आले. बँकेकडून ग्राहकांना चुकीचे ऑनलाईन ट्रांझेक्शन झाल्याची माहिती एसएमएस द्वारे देण्यात आली होती. मात्र दहा दिवसानंतर देखील ग्राहकांच्या खात्यात पैसा जमा न झाल्याने, याची गंभीर दखल आरबीआयने घेतली. या प्रकरणात सेंट्रल बँक ऑफ इंडियाला तब्बल 36 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला असून, याचा ग्राहकांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्टीकरण आरबीआयच्या वतीने देण्यात आले आहे.
यापूर्वी देखील आरबीआयच्या वतीने नियमाचे उल्लंघन तसेच केवायसी उल्लंघन केल्याप्रकरणी चार सहकारी बँकांना चार लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. ग्राहकांच्या हीतासाठी वारंवार आरबीआयच्या वतीने विविध नियम तयार करण्यात येतात या नियमांचे पालन करणे कोणत्याही बँकांना बंधनकारक असते. मात्र नियमांचे उल्लंघन झाल्यास आरबीआयच्या वतीने बँकांना दंड ठोठवण्यात येते, काही प्रसंगी तर बँकांचे परवाने देखील निलंबित करण्यात येतात.