Rupees : रुपया लवकरच होणार धाकड! डॉलरला देणार टक्कर, अमेरिकन चलनाची दादागिरी कमी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक सज्ज

Rupees : आंतरराष्ट्रीय चलन म्हणून रुपया लवकरच दबदबा निर्माण करण्याच्या तयारीत आहे.

Rupees : रुपया लवकरच होणार धाकड! डॉलरला देणार टक्कर, अमेरिकन चलनाची दादागिरी कमी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक सज्ज
वाढणार रुपयाचे वजन
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 7:24 PM

नवी दिल्ली : परदेशातून आयात असो वा निर्यात भारताला आंतरराष्ट्रीय चलनातच (International Currency) त्याचे बिल अदा करावे लागते. अर्थातच जगभरात डॉलरचा आंतरराष्ट्रीय व्यापार (International Trade) आणि व्यवहारासाठी वापर करण्यात येतो. पण आता हे चित्र लवकरच बदलणार आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत आपटी खात असला तरी तो डॉलरलाच पर्याय ठरु पाहत आहे. डॉलरऐवजी (Dollar) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी रुपयाचा (Rupee) वापर करण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. काही देशांनी त्याला मान्यताही दिली आहे. त्यामुळे केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India-RBI) त्यासाठी कंबर कसली आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी याविषयीची माहिती दिली. व्यापारात रुपयाचा चलन म्हणून वापर करण्यासाठी केंद्र सरकार आणि केंद्रीय बँकेने पुढाकार घेतला आहे. दक्षिण आशियातील देशांसोबत याविषयीची चर्चा सुरु असल्याचा दावा दास यांनी केला.

डिजिटल रुपयाच्या वापरासंबंधी आरबीआय अत्यंत जाणीवपूर्वक आणि सतर्कतेने पावलं टाकत असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. गेल्यावर्षी 1 डिसेंबरपासून आरबीआयने डिजिटल रुपयाचा प्रायोगिक वापर सुरु केला आहे.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) आयोजित केलेल्या एका संमेलनात त्यांनी अनेक विषयांवर त्यांची मते मांडली. तसेच दक्षिण आशियातील देशांपुढे महागाई कमी करण्याचे आणि महागाई आटोक्यात ठेवण्याचे आवाहन असल्याचे ते म्हणाले. त्यादृष्टीने रुपयाचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे.

सीमापार व्यापार आणि CBDC योजनेत रुपयाला प्रोत्साहन देण्यासाठी RBI ने प्रयत्न सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. कोविड, महागाई, आर्थिक बाजारातील कडक धोरण, रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध यामुळे दक्षिण आशिया देशांनी परस्पर सहकार्याने समस्या सोडविण्यावर भर देण्यावर त्यांनी जोर दिला.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात रुपयाविषयीची महत्वकांक्षी योजना सुरु केली होती. ज्या देशात अमेरिकन डॉलरची गंगाजळी कमी आहे. अशा देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी भारतीय रुपयांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे या देशांना भारतीय रुपयांमध्ये व्यापारी सौदे आणि व्यवहार पूर्ण करता येतील, सेटलमेंट पूर्ण करता येईल.

या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. RBI ने आतापर्यंत 18 वास्त्रो खाते (Vostro Accounts) सुरु केली आहेत. यामध्ये रशियासाठी 12, श्रीलंकेसाठी 5 तर मॉरिशससाठी 1 खात्याचा समावेश आहे. या तीन देशांमध्ये भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरता येणार आहे.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.