RBI Penalty : सव्वा 2 कोटींचा दंड! कोणत्या बँकेवर केली RBI ने कारवाई

RBI Penalty : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसीनंतर आता या बँकेवर जबरी दंड ठोठवला आहे. नियमांची पुर्तता न केल्याने या बँकेला जोरदार दणका दिला आहे. या बँकेच्या महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात शाखा आहे. तुमचे खाते तर नाही ना या बँकेत

RBI Penalty : सव्वा 2 कोटींचा दंड! कोणत्या बँकेवर केली RBI ने कारवाई
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 11:47 AM

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या (NHB) नियमांचे उल्लंघन केल्याने एचडीएफसीवर (HDFC) दंड ठोठावला होता. आरबीआयने हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला (HDFC Ltd.) पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. दोन-तीन दिवसांपूर्वी ही कारवाई करण्यात आली होती. प्रकरणात कंपनीला उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानंतर आरबीआयने दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसीनंतर आता या बँकेवर जबरी दंड ठोठवला आहे. नियमांची पुर्तता न केल्याने या बँकेला जोरदार दणका दिला आहे. या बँकेच्या महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात शाखा आहे. तुमचे खाते तर नाही ना या बँकेत.

आरबीआयने गेल्या काही दिवसांपासून नियमांचे सातत्याने उल्लंघन केल्याप्रकरणात ही कारवाई केली आहे. यापूर्वी एचडीएफसी लिमिटेडवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. आता आरबीआयने या बँकेला जबरी दंड ठोठावला. या बँकेला सव्वा 2 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी पण या बँकेवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्यानंतर या बँकेविरोधात ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्रात आरबीएल बँकेच्या (RBL Bank Ltd.) अनेक शाखा आहेत. अगदी निमशहरी भागातही या बँकेने बस्तान बसवलं आहे. या बँकेने विविध आकर्षक योजना आणून ग्राहकांना आपलंस केले आहे. पण नियमांचं पालन न केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या बँकेवर 2.27 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकेसोबतच इतर ही बँकांवर कारवाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

या कारणांमुळे ठोठावला दंड

लोकपाल योजना, 2018 च्या काही तरतुदींचे पालन न केल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. व्यवहार संहिता, क्रेडिट कार्ड ऑपरेशन्स, बँकांचे जोखीम व्यवस्थापन आणि वित्तीय सेवा आणि रिकव्हरी एजंट्सचे आउटसोर्सिंग याच्यांशी संबंधित नियमांबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 ते 2021-22 या कालावधीतील नियामकाचे नियम न पालन केल्याने आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

एकट्या आरबीएलविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असे नाही, तर सोलापूर येथील लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईतील रायगड सहकारी बँक, जालंधर येथील इंपीरिअल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मध्य प्रदेशातील रायनसे येथील जिल्हा सहकारी केंद्रीय बँक, मंदसौर येथील स्मृती नागरीक सहकारी बँक, उत्तर प्रदेशातील नोएडा येथील नोबल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.