RBI Alert: NEFT सुविधेबाबत आरबीआयची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी 14 तास सेवा बंद राहणार

व्यावसायिक आणि बँकांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. Reserve Bank of India NEFT

RBI Alert: NEFT सुविधेबाबत आरबीआयची मोठी घोषणा, 'या' दिवशी 14 तास सेवा बंद राहणार
आरबीआय
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 3:31 PM

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात बँकांच्या कामकाजाच्या वेळा बदलण्यात आलेल्या आहेत. सर्वाधिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत. व्यावसायिक आणि बँकांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ट्विट करुन ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी सेवा 23 मे रोजी 14 तासांसाठी बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. एनईएफटीद्वारे द्वारे आपण भारतातील कोणत्याही ठिकाणी बँकेच्या शाखेत न जाता पैसे पाठवू शकतो. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर सिस्टीम (NEFT) संपूर्ण देशात वापरली जाते. या सेवेद्वारे पैसे पाठवण्यासाठी किमान किंवा कमाल मर्यादा नसते. (Reserve Bank of India issue alert that NEFT service is on downtime from 12 am to 14:00 pm on May 23 due to technical upgradation)

रिझर्व्ह बँकेचे ट्विट

RBI ने त्यांच्या Twitter हँडलवरुन ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. 22 मे रोजी बँकांचं कामकाज संपल्यानंतर टेक्निकल अपग्रेडेशन मुळे NEFT 23 मे रोजी 00:01 ते दुपारी 14:00 म्हणजेत (रात्रीच्या 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत) बंद राहिल. दुसरीकडे RTGS सेवा सुरु राहणार आहे.

NEFT सेवा नेमकी काय?

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर सिस्टम ही अशी सुविधा आहे जी तुम्हाला तुमच्या बँकेच्या मोबाईल अ‌ॅपवर वापरता येते. या सुविधेद्वारे काही मिनिंटांमध्ये पैसे पाठवले जातात. एनईएफटी ही सरळ आणि सोपी, सुरक्षित सुविधा आहे. ही सेवा वापरल्यानंतर ईमेल आणि एसएमएस ग्राहकांना प्राप्त होतो. इंटरनेट बँकिगद्वारे ही सुविधा कधीही वापरता येते. एनईएफटीद्वारे दोन्ही व्यक्तींना एकाच ठिकाणी उपस्थित राहण्याती गरज नाही. या सुविधेद्वारे करण्यात आलेल्या व्यवहाराची माहिती पैसे पाठवणाऱ्याला आणि पैसे स्वीकारणाऱ्याला देखील मिळते.

NEFT द्वारे पैसे कसे ट्रान्सफर करायचे?

लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे तुमचं ऑनलाईन बैंकिंग अकाउँट ओपन करा. NEFT Fund Transfer सेक्शनमध्ये जावा. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या डिटेल्स अ‌ॅड करा. त्यानंतर त्याचं नाव, बँक अकाऊंट नंबर आणि आयएफएससी कोड टाका. ज्याला पैसे पाठवणार आहोत त्याची माहिती सेव झाली की तुम्ही पैसे पाठवू शकता. तुम्हाला जितकी रक्कम पाठवायची आहे ती टाका आणि पैसे पाठवा. बँका NEFT शिवाय IMPS आणि RTGS सेवा देतात. या दोन्ही सेवा २३ मे रोजी सुरु राहणार आहेत.

संबंधित बातम्या:

PF अकाऊंटशी संबंधित ‘हे’ काम तातडीने करा, नाहीतर पैसे कापले जाणार

बंद असलेल्या बँकेच्या खात्यांवरही मिळते व्याज, पैसे काढण्यासाठी असे सुरु करा अकाऊंट

Reserve Bank of India issue alert that NEFT service is on downtime from 12 am to 14:00 pm on May 23 due to technical upgradation

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.