Gautam Adani | गर्भश्रीमंतांना बसला झटका, झरझर घसरला संपत्तीचा आलेख

Gautam Adani | जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीला सुरुंग लागला. त्यांच्या संपत्तीत तुफान घसरण झाली. इथं एक रुपया हरवला तर जीव कासावीस होतो, तिथे या अब्जाधीशांना तर कोट्यवधींचा फटका बसला आहे. त्यात भारतीय अब्जाधीशांचा पण क्रमांक आहे. गौतम अदानी यांनी मात्र करिष्मा दाखवला आहे.

Gautam Adani | गर्भश्रीमंतांना बसला झटका, झरझर घसरला संपत्तीचा आलेख
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 2:17 PM

नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : जगातील गर्भश्रीमंतांच्या संपत्तीला सुरुंग लागला आहे. पण सर्वांनाच हा झटका बसलेला नाही. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, गुरुवारी जगातील टॉप 10 श्रीमंतांपैकी 7 जणांच्या एकूण संपत्तीत मोठी घसरण आली. पण जगातील दुसरे सर्वात श्रीमंत बर्नार्ड आरनॉल्ट त्याला अपवाद ठरले. त्यांच्या संपत्तीत 99.9 कोटी डॉलरची तेजी आली. त्यांची एकूण संपत्तीत 155 अब्ज डॉलर आहे. Amazonचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या संपत्तीत गुरुवारी 1.79 कोटी डॉलरची वाढ झाली. त्यांची संपत्ती आता 152 अब्ज डॉलर हे. ते यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. स्टीव्ह बाल्मर यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. बाकी सर्व श्रीमंतांना झटका बसला आहे.

एलॉन मस्क याला फटका

जगातील सर्वात श्रीमंत एलॉन मस्क यांच्या नेटवर्थमध्ये गुरुवारी मोठी घसरण आली. त्याला 16.1 अब्ज डॉलर म्हणजे 13,39,17,94,85,000 रुपयांचा फटका बसला. लक्ष्मी मित्तल यांची संपत्ती इतकी आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, मित्तल यांची संपत्ती 16.9 अब्ज डॉलर आहे. इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत 44 टक्क्यांचा फटका बसला. त्यामुळे मस्कच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. त्याची मिळकत आता 210 अब्ज डॉलर झाली आहे. या वर्षात त्याच्या संपत्तीत 72.6 अब्ज डॉलरची तेजी दिसली. तर टेस्ला पण क्रमवारीतेत खाली आली आहे. तिचे मार्केट कॅप 698.62 अब्ज डॉलर उरले आहे.

हे सुद्धा वाचा

मुकेश अंबानी यांना किती फटका

भारत आणि आशियातील श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गुरुवारी मोठी घसरण झाली. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार, अंबानींच्या नेटवर्थमध्ये 64.3 कोटी डॉलरची घसरण झाली. ही संपत्ती 85.9 अब्ज डॉलर उरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी या घसरणीमुळे श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानी फेकले गेले. त्यांच्या संपत्तीत यंदा 1.17 अब्ज डॉलरची तेजी दिसली.

गौतम अदानी यांचा करिष्मा

बिल गेट, लॅरी पेज, लॅरी एलिसन, सर्गेई ब्रिन, वॉरेन बफे आणि मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. सर्वांना गौतम अदानी यांनी धक्का दिला आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. या वर्षात त्यांच्यावर संकटांची मालिका सुरुच आहे. आरोपांची राळ उठली आहे. सरकारच्या एजन्सीज पण चौकशीसाठी उतरल्या आहेत. अशावेळी त्यांच्या संपत्तीत एक कोटी डॉलरची तेजी आली. त्यांची संपत्ती 61.2 अब्ज डॉलरने वाढली आहे. ते सध्या या यादीत 20 व्या क्रमांकावर आहेत.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.