Richest Indian | टाटा-बिर्ला नाही, ना अंबानी, या व्यक्तीकडे होती सर्वाधिक संपत्ती
Richest Indian | आज पण देशात हैदराबादमधील निजाम मीर उस्मान अली खान इतका धनकुबेर कोणीच नाही. महागाईनुसार, संपत्तीची तुलना केली तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनॉल्ट यांच्यापेक्षा पण या निजामची सध्यस्थितीत अधिक संपत्ती असेल. त्याच्याकडे इतके लाख कोटींची संपत्ती असण्याचा अंदाज आहे.
नवी दिल्ली | 21 February 2024 : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावाची चर्चा होते. त्यावेळी गौतम अदानी, मुकेश अंबानी, रतन टाटा, बिर्ला, शिव नाडर यांची नावे अग्रक्रमाने पुढे येतात. पण सर्वाधिक श्रीमंतीचा मान एका निजामाकडे आहे. सध्याच्या महागाईनुसार, त्याच्या संपत्ती तुलना केली तर त्याची संपत्ती, सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनॉल्ट याच्यापेक्षा पण अधिक आहे. निजाम मीर उस्मान अली खान हा जगातील धनकुबेर होता. त्याने 1911 ते 1948 पर्यंत असे 37 वर्षे हैदराबाद संस्थानाचा कारभार हाकला. त्याच्याकडे हिरे, माणिक मोत्यांचे अमूल्य साठा होत. हिऱ्यांचा तो पेपरवेट सारखा वापर करत होता.
इतक्या लाख कोटींची संपत्ती
Nizam mir Osman Ali Khan याची संपत्ती सध्याच्या महागाईनुसार, ग्राह्य धरली तर त्याची संपत्ती 17.47 लाख कोटी रुपये (230 अब्ज डॉलर 1,74,79,55,15,00,000 रुपये) यापेक्षा अधिक असेल. सध्या जगात फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट हे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कुटुंबाकडे एकूण 221 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असल्याचे मानले जाते. मी
या खाणीमुळे झाला मालामाल
- मीर उस्मान अली खानच्या कार्यकाळात गोवळकोंडा येथील खाणीने त्याला मालामाल केले. त्याचा महसूल या खाणीमुळे वधारला होता. या खाणीतून 18 व्या शतकापासून हिरे मिळत होते. मीर उस्मानला उस्मानिय जनरल हॉस्पिटल, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, उस्मानिया विद्यापीठ स्थापन करण्याचे श्रेय देण्यात येते.
- मीर उस्मान याच्या पायाशी श्रीमंती लोळण घेत होती. तो पण आलिशान जीवन जगत होता. त्याच्या खासगी खजिन्यात 40 कोटी पाँड (जवळपास 4,226 कोटी रुपये) मूल्याचे दागदागिने आणि 10 कोटी पाँड (जवळपास 1,056 कोटी रुपये) मूल्याचे सोने होते. एकाहून एक हिऱ्यांचा त्याच्याकडे संग्रह होता. त्यामध्ये दरिया-ए-नूर, नूर-उल-ऐन डायमंड, कोहिनूर, होप डायमंड, प्रिंसी डायमंड, रिझेंट डायमंड आणि विटल्सबॅक डायमंडचा समावेश होता.
- त्यांच्याकडच्या जॅकब हिऱ्याची जोरदार चर्चा होत असते. त्याचा वापर हा निजाम पेपरवेट सारखा करत होत. या हिऱ्याची किंमत 1340 कोटी रुपये होती. श्रीमंती पायाशी लोळण घेत असताना हा निजाम कंजूष असल्याचे पण अनेक दाखले मिळतात. त्याची पण खास किस्से सांगण्यात येतात.