क्रिप्टोच्या दरात तेजी; जाणून घ्या प्रमुख करन्सींचे दर

Bitcoin Prices Today गेल्या दोन -तीन  दिवसांपासून क्रिप्टो करन्सीच्या दरात घसरण सुरू होती. अखेर या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज पुन्हा एकदा क्रिप्टोच्या दरात तेजी आली आहे. गेल्या 24  तासांमध्ये क्रिप्टो करन्सीची मार्केट कॅप 2.20 ट्रिलियन डॉलरवरून 2.27 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे.

क्रिप्टोच्या दरात तेजी; जाणून घ्या प्रमुख करन्सींचे दर
बिटकॉईन
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 2:07 PM

नवी दिल्ली : Bitcoin Prices Today गेल्या दोन -तीन  दिवसांपासून क्रिप्टो करन्सीच्या दरात घसरण सुरू होती. अखेर या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज पुन्हा एकदा क्रिप्टोच्या दरात तेजी आली आहे. गेल्या 24  तासांमध्ये क्रिप्टो करन्सीची मार्केट कॅप 2.20 ट्रिलियन डॉलरवरून 2.27 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे. लोकप्रिय क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉईनचे भाव  दोन टक्क्यांनी वधारले आहेत. बिटकॉईनचे दर 39,71,544 रुपये  प्रति बिटकॉईनवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे इथेरियमच्या दरात देखील वाढ झाली असून, इथेरियमचे दर 3,27,111.0 रुपयांवर पोहोचले आहेत.

कार्डानोच्या दरातही वाढ

बिटकॉईन आणि इथेरियमप्रमाणेच कार्डानोच्या किमतीमध्ये देखील 11 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचे दर 111,3999 रुपये प्रति कार्डानोवर पोहोचले आहेत. किप्टोच्या इतर करन्सीमध्ये वाढ होत असताना पोलकाडॉचे दर मात्र घसरले आहेत. पोलकाडॉटच्या दरामध्ये गेल्या 24 तासांत दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. बिनान्सचे दर देखील तुरळक घसरले आहेत. बिनान्सच्या दरात 0.98 टक्क्यांची घसरण झाली आहे.

क्रिप्टोमधील गुंतवणूक वाढली 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जगभरामध्ये क्रिप्टो करन्सीची लोकप्रियता वाढत आहे. सोन्याचे दर सातत्याने कमी जास्त होत असल्याने त्याचा मोठा फटका हा गुंतवणुकदारांना बसला आहे. याउलट क्रिप्टोचे दर काही अंशी स्थिर असल्यामुळे क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक वाढत आहे. सोन्यामधील गुंतवणूक कमी होऊन, क्रिप्टोमधील गुंतवणूक वाढली आहे. मात्र भारतामध्ये क्रिप्टोला अद्यापही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे  केंद्र सरकार क्रिप्टोबाबत काय निर्णय घेणार याकडे भारतीय उद्योग जगताचे डोळे लागले आहेत. क्रिप्टोला परवानगी मिळते की नाही? यावर बरेच आर्थिक समिकरणे अवलंबून असणार आहेत.

संबंधित बातम्या 

कोरोनामुळे झालेले नुकसान वेगाने भरून काढणाऱ्या निवडक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश; अर्थ मंत्रालयाकडून अहवाल सादर

पूर्व-मध्य रेल्वे मालामाल; प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली, उत्पन्नात 49 टक्क्यांची वाढ

तुर्कीत महागाईचा भडका; मुदतपूर्व निवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी, नागरिकही सरकारच्या धोरणांवर नाराज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.