Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishi Sunak Networth : देशाचा जावाई अब्जाधीश, ऋषी सुनक-अक्षता मूर्ती इतक्या संपत्तीचे धनी

Rishi Sunak Networth : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांचे पती आणि इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक जी20 संमेलनात दाखल झाले आहे. ऋषी सुनक यांनी ग्रीन क्लायमेंट फंडासाठी 2 अब्ज डॉलर देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे.

Rishi Sunak Networth : देशाचा जावाई अब्जाधीश, ऋषी सुनक-अक्षता मूर्ती इतक्या संपत्तीचे धनी
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 2:14 PM

नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : जी20 संमेलनात (G20 Summit) जगातील दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आणि जावाई या संमेलनासाठी भारतात दाखल झाले आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak Networth)आणि अक्षता मूर्ती यांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. ऋषी सुनक यांनी ग्रीन क्लायमेंट फंडासाठी 2 अब्ज डॉलर देण्याची घोषणा केली आहे. इन्फोसिस कंपनीचे अक्षता मूर्ती यांच्याकडे अनेक शेअर आहेत. तर त्यांचे पती ऋषी सुनक यांच्याकडे पण मोठी संपत्ती आहे. या संमेलनात सहभागी होणारे हे दाम्पत्य श्रीमंत आहे. इंग्लंडमध्ये आलिशान बंगला, लक्झरी कार आहेत. त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे.

श्रीमंतांच्या यादीत कितवा क्रमांक

इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांच्याकडे आलिशान चारचाकी, आलिशान बंगले आणि कोट्यवधींची संपत्ती आहे. संडे टाईम्स यांच्यानुसार ऋषी सुनक हे जगातील श्रीमंतांच्या यादीत आहेत. ते या यादीत 222 व्या क्रमांकावर आहेत. सुनक आणि त्यांच्या पत्नीकडे मिळून 756 कोटींची संपत्ती आहे. अक्षता मूर्ती या नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी आहे. इन्फोसिस कंपनीत त्यांच्या नावे अनेक शेअर आहेत. मध्यंतरी सुनक या मुद्यामुळे अडचणीत आले होते. त्यांच्या पत्नीच्या या कमाईवरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

इतकी झाली होती कमाई

इन्फोसिसला या आर्थिक वर्षात ( FY23) अंतिम लाभांश जाहीर झाला. प्रति शेअर 17.50 रुपये लाभांश देण्यात येणार आहे. त्यानुसार, नारायण मूर्ती, त्यांची पत्नी सुधा एन. मुर्ती, त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि मुलगी अक्षता मूर्ती सुनक यांना लाभांशातून एकूण 264.17 कोटी रुपयांची कमाई झाली. डिसेंबर तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, अक्षता मूर्ती यांच्याकडे 31 डिसेंबर 2022 पर्यंत 3,89,57,096 शेअर म्हणजे, 1.07 टक्के वाटा होता. त्यांना यामाध्यमातून 68.17 कोटी रुपयांची कमाई झाली.

सुनक यांच्याकडे किती संपत्ती

756 कोटींच्या संयुक्त संपत्तीत सुनक यांच्याकडे 200 दशलक्ष युरो म्हणजे 178 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मिररमधील एका रिपोर्टनुसार ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी 4 लाख युरोचे खास सुट्या घालविण्यासाठी मोठा बंगला तयार केले आहे. यामध्ये तर 2 दशलक्ष युरोचे तर केवळ महल तयार केला आहे. सुनक यांच्याकडे केवळ हीच एक आलिशान मालमत्ता नाही. सुनक आणि त्यांच्या पत्नीकडे नॉर्थ यॉर्कशायर यांच्याकडे 18 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. यामध्ये स्वीमिंग पूल, टेनिस कोर्ट सह अनेक सुविधा आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.