Ritesh Agrawal : पैसे जमविण्यासाठी सिम कार्ड विकले, आज आहे कोट्यवधींचा मालक

Ritesh Agrawal : कधी काळी पोटापाण्यासाठी सिमकार्ड विक्री करणाऱ्या रितेश अग्रवालने आता थेट शार्क टँक इंडियात धडक दिली आहे. त्याच्या संघर्षाचे सर्वच तरुण उद्योजक साक्षीदार होतील. त्याने आयडियाची कल्पना लढवत त्याचा व्यवसाय उभारला. अवघ्या 27 व्या वर्षीच तो करोपती झाला. आता तो शार्क टँकमध्ये अविश्वसनीय कल्पना घेऊन येणाऱ्यांना पाठिंबा देईल.

Ritesh Agrawal : पैसे जमविण्यासाठी सिम कार्ड विकले, आज आहे कोट्यवधींचा मालक
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 9:48 AM

नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : देशातील कुठल्याही शहरात गेला तर, सर्वात अगोदर आपण राहण्याची व्यवस्था शोधतो. अशावेळी अनेक ठिकाणी OYO Rooms चा बोर्ड आपले लक्ष वेधतो. तर या OYO Rooms च्या व्यवसायाची सुरुवात रितेश अग्रवाल याने केली आहे. अत्यंत हालकीच्या परिस्थितीतून रितेशने त्याला सिद्ध करुन दाखवले आहे. 18 व्या वर्षी घर खर्च चालविण्यासाठी त्याचे शिक्षण सुटले. त्याने सिम कार्ड विक्री केली. छोटी-मोठी काम करत राहिला. त्यानंतर त्याला एक आयडिया सुचली. त्या कल्पनेवर त्याने आज कोट्यवधींचा व्यवसाय उभारला. रितेश अग्रवाल (Ritesh Agrawal) आज 7200 कोटींचा मालक आहे. त्याच्या मेहनतीला यशाचे पंख लागले आहे. आता तो अनेकांच्या कल्पनेला पैशांचे बळ देणार आहे.

शार्क टँक इंडियात दाखल

देशातील स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी, त्यांना फंडिंग करण्यासाठी देशात शार्क टँक इंडिया हा रिएलिटी शो सुरु करण्यात आला आहे. आता या शोमध्ये नवीन जजची एंट्री होत आहे. OYO Rooms चा संस्थापक रितेश अग्रवाल हा शार्क टँक इंडियात सहभागी होत आहे. रितेश बोटचा सहसंस्थापक अमन गुप्ता, शादी डॉट कॉमचा संस्थापक अनुपम मित्तल, शुगर कॉस्मेटिकची सीईओ विनिता सिंह आणि लेन्सकार्टचा सहसंस्थापक पीयूष बन्सल यांच्यासोबत शार्क्सच्या भूमिकेत दिसेल. रितेश इतर जजपेक्षा वयाने लहान असला तरी त्याची नेटवर्थ इतरांपेक्षा अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

खिशात होते 30 रुपये​

आज रितेश अग्रवालकडे 7200 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पण एकवेळ अशी होती की त्याच्या खिशात केवळ 30 रुपये होते. तो मुळचा ओडिशाच्या रायगड जिल्ह्यातील रहिवाशी आहे. त्याने आयआयटी इंजिनिअर व्हावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. त्यामुळे त्याने राजस्थानमधील कोटा शहर गाठले. पण त्याचे मन लागत नव्हते. त्याला फिरण्याची आवड होती. हॉटेलमध्ये राहण्यासाठी अनेक अडचणींचा त्याला सामना करावा लागत असे. त्यातूनच त्याला पुढे OYO Rooms ची आयडिया सुचली.

मिळाली फेलोशिप

2012 मध्ये त्याने ओरावेल स्टेज नावाने स्टार्टअप सुरु केले. पण हा प्रयोग अयशस्वी झाला. त्याला नुकसान सहन करावे लागले. त्यावेळी रितेशच्या खिशात 30 रुपये होते. दिल्लीत त्याने सिमकार्ड विक्री सुरु केली. एक छोट्या दुकानातून त्याने काम सुरु केले. दिल्लीतील मोठ मार्केटमध्ये त्याच्या व्यवसायाची सुरुवात झाली. 2013 मध्ये थिएल फेलोशिपसाठी त्याची निवड झाली. दोन वर्षांच्या या काळात त्याला 1 लाख डॉलर मिळाले. त्यातूनच त्याने OYO रुम्सची सुरुवात केली. आज ओयो जगभरातील 35 देशात पोहचली आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.