वीज बिल येणार नाही, सोलार पॅनल लावा…, सरकार करतंय इतक्या पैशांची मदत

सध्यातरी सरकार सोलार पॅनल लावण्यासाठी लोकांना मदत करीत आहे. त्यासाठी एक स्किम चालवली जात आहे. तुम्ही तुमच्या घरावर, अंगणात सोलार पॅनल लावून सरकारी मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमची महागड्या वीजेपासून कायमची सुटका होणार आहे.

वीज बिल येणार नाही, सोलार पॅनल लावा..., सरकार करतंय इतक्या पैशांची मदत
solar lightImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 9:46 AM

मुंबई : जसा उन्हाळा वाढेल तशी तुमच्या घरातील वीज (Light) गायब होईल, कारण उन्हाळ्यात वीजेचा अधिक वापर होतो. सद्या वीजेचे अधिक दर वाढल्यामुळे सगळ्यांना मोठा फटका बसत आहे, त्याचबरोबर भविष्यात सु्द्धा अशा पद्धतीचा फटका बसण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या घरी कायमची लाईट हवी असल्यास, तुमच्यासाठी सोलार (Solar) हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारचं महिन्याचं लाईट बील (electricity bill) भरावं लागणार नाही. तसेच सोलारवरती घरातील अनेक उपकरण देखील चालतात.

केंद्र सरकार सोलार पॅनल अधिक लोकांना वापरावं यासाठी मदत करीत आहे. तुम्ही सोलार पॅनेल लावण्याचा प्रयत्न करीत असाल, तर सरकारची योजनेची नक्की माहिती घ्या. त्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या घरात किती वीज लागणार आहे, याची माहिती घ्या.त्यानुसार तुम्हाला सोलार पॅनेल लावून घ्यावा लागेल. समजा तुमच्या घरात रोज दोन किंवा तीन पंखे चालतात, एक फ्रिज आहे, सात ते आठ एलईडी ब्लब चालतात, टिव्ही, अशा वस्तू तुमच्या घरात असतील तर, तुम्हाला सहा ते आठ युनिट वीज लागणार आहे.

तुम्ही तुमच्या घरावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावून तुम्हाला जितकी गरज आहे, तितकी असलेली वीज निर्माण करू शकता. मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले सौर पॅनेल आहेत. विशेष म्हणजे पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी वीज निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर ‘रूफटॉप योजना’ सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा

एकदा लावलेलं सोलार पॅनेल हे २५ वर्षे सुरु राहू शकतं, त्यासाठी तुम्हाला सध्या १ लाख २० हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो. सरकारकडून तुम्हाला ४० टक्के रक्कम मिळते. त्यामुळे तुम्हाला ७२ हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो.

अर्ज करण्यासाठी, Sandes App डाउनलोड करा आणि पोर्टलवर नोंदणी करा.

१) सुरुवातीला

तुमचे राज्य निवडा. तुमची वीज वितरण कंपनी निवडा. तुमचा वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा. कृपया मोबाईल नंबर टाका. ईमेल आयडी भरा. त्यानंतर पोर्टलच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.

2) दुसरी स्टेप

वापरकर्ता क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉगिन करा. फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.

3) तिसरी स्टेप

डिस्कॉमच्या मंजुरीची प्रतीक्षा करा. मंजुरी मिळाल्यानंतर, DISCOM पॅनेलमधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सौर पॅनेल स्थापित करा.

४) चौथी स्टेप

सोलर पॅनल बसवल्यानंतर त्याचा तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.

५) पाचवी स्टेप

DISCOM द्वारे नेट मीटरची स्थापना आणि तपासणी केल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.

६) सहावी स्टेप

कमिशनिंगचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात ३० दिवसांच्या आत येईल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.