RR Kabel : गुंतवणूकदारांना लागली लॉटरी! आता पैशांचा पाडणार पाऊस

| Updated on: Sep 20, 2023 | 3:28 PM

RR Kabel : इलेक्‍ट्रॉनिक कंपनी आरआर केबलने बाजारात आज चांगलाच धुमाकूळ घातला. एका शेअरने गुंतवणूकदारांना 144 रुपयांचा फायदा मिळवून दिला. आता पुढे काय पैशांचा पाऊस पडणार आहे काय?

RR Kabel :  गुंतवणूकदारांना लागली लॉटरी! आता पैशांचा पाडणार पाऊस
Follow us on

नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : इलेक्ट्रॉनिक उत्पादनं तयार करणारी आरआर केबल कंपनी (RR Kabel) गुंतवणूकदारांच्या विश्वासाला पात्र ठरली. या कंपनीने आज शेअर बाजारात एकच धुमाकूळ घातला. या कंपनीच्या आयपीओवर (IPO) गुंतवणूकदारांनी जेवढा विश्वास दाखवला, त्यापेक्षा त्यांना अधिक परतावा मिळाला. स्टॉक एक्सचेंजवर कंपनी बुधवारी, 20 सप्टेंबर रोजी सूचीबद्ध झाली. या कंपनीच्या स्टॉकची इश्यू प्राईज 14 टक्क्यांनी सुरु झाली. पण बाजारात पाऊल टाकताच या शेअरने सर्वांचे अंदाज धुडकावून लावले. या कंपनीने पहिल्याच फटक्यात गुंतवणूकदारांना 14 टक्के नफा मिळवून दिला. एका शेअरवर गुंतवणूकदारांनी 144 रुपयांचा फायदा कमावला.

असा झाला फायदा

आर आर केबलची इश्यू प्राईज 1,035 रुपये प्रति शेअर होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) हा शेअर 1,179 रुपये आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 1,179 रुपये किंमतीवर तो सूचीबद्ध झाला. म्हणजे सूचीबद्ध होतानाच या शेअरने गुंतवणूकदारांना 144 रुपये प्रति शेअरचा फायदा मिळवून दिला. आता बाजाराती तज्ज्ञांच्या मते, हा शेअर 10 ते 15 टक्के प्रीमियमची कमाल करेल.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांच्या पडल्या उड्या

आरआर केलबचा आयपीओ किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हातोहात खरेदी केला. या कंपनीचा आयपीओ एकूण 18.69 पट सब्सक्राईब झाला. तर क्वालीफाईड इन्स्टिट्यूशनल इनव्हेस्टर्सने तर 52.26 पट बोली लावली. म्हणजे या मंडळीनी त्यांना दिलेल्या कोट्यापेक्षा 52 पट अधिक शेअरची मागणी केली. किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांना दिलेल्या कोट्यापेक्षा 2.13 पट अधिक बोली लावली.

कंपनी सध्या मजबूत स्थिती

पंखे, वायर, केबलसह वीजेशी संबंधित उत्पादने तयार करणाऱ्या या कंपनीचा आयपीओ बाजारात आल्याने गुंतवणूकदारा मालामाल झाले. तर कंपनीने बाजारातून 1,964.01 कोटींचे भांडवल जमवले. यामध्ये 180 कोटींचा फ्रेश इश्यू होता. तर 1,784.01 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल (OFS) होता.

पैशांचा पडेल पाऊस

आरआर केबलचा नफा आताच मिळाला आणि संपले असे नाही. बाजारातील तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या मते हा लंबी रेस का घोडा आहे. या स्टॉकला त्यांनी चांगले रेटिंग दिले आहे. या शेअरची किंमत लवकरच 1,407 रुपये प्रति शेअरवर पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही तज्ज्ञांच्या मते काही दिवसांतच हा शेअर तगडा नफा कमावू शकतो.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.