RBI News on 2000 Note : नोटबंदीचा असाही दणका, रिअल इस्टेटला किती धोका?

RBI News on 2000 Note : नोटबंदीनंतर रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा दणका बसला होता. यावेळी पण दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राचा पाया पुन्हा हादरणार का?

RBI News on 2000 Note : नोटबंदीचा असाही दणका, रिअल इस्टेटला किती धोका?
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 8:44 PM

नवी दिल्ली : 8 नोव्हेंबर 2016 ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात ठळकपणे नोंदवलेली तारीख आहे. आता त्यात 19 मे 2023 ही तारीख पण जोडल्या गेली. कानामागून आली नी तिखट झाली, असा प्रकार या नोटबंदीचा (Demotization) होण्याची शक्यता आहे. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारने 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. आज भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट व्यवहारातून बाद केली. मोदी सरकारच्या कार्यकाळतील पहिल्या नोटबंदीनंतर रिअल इस्टेट क्षेत्राला (Real Estate Sector) मोठा दणका बसला होता. यावेळी दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राचा पाया पुन्हा हादरणार का?

जमीनीसह मोठे प्रकल्प रखडले यापूर्वीच्या नोटबंदीनंतर अनेक क्षेत्रावर तिचा परिणाम दिसला. पण रिअल इस्टेट क्षेत्र एकदम हादरले. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्याने जमिनीचे व्यवहार थंडावले. तर मोठ्या प्रकल्पांना ताळे लावावे लागले. काहींनी रखडत रखडत प्रकल्प पूर्ण केले. मोठे सौदे हे काळ्या पैशांच्या माध्यमातून होतात. पण नोटबंदीमुळे अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. आता ही 2000 रुपयांची नोट ही गैरव्यवहार करण्यासाठी मोठं माध्यम ठरत होती. कारण सर्वाधित नकली नोटा या 2000 रुपयांच्याच आढळून आल्या.

असा ही चांगला परिणाम यापूर्वी देशात रिअल इस्टेटमध्ये रोखीतील व्यवहारांचे प्रचलन होते. नोटबंदीनंतर धनादेश, ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण वाढेल. रिअल इस्टेटमध्ये पण अनेक सुधारणा झाल्या. एक नियामक मंडळ, एक न्यायाधिकरण आले. रेरा सारखा महत्वपूर्ण कायदा आला. त्यामुळे बऱ्यापैकी पारदर्शकता आली. तरीही मूल्य कमी दाखवून जागा, फ्लॅट्सची विक्री होते. तसेच अनेक जण त्यांचा ब्लॅकमनी या क्षेत्रात गुंतवत असल्याचे अनेक प्रकरणात समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

परिवर्तनाची नांदी बांधकाम क्षेत्रात अनेक कायदे, नियम आणण्यात आले आहेत. बांधकाम क्षेत्र परिवर्तनाच्या कालावधीतून जात आहे. रेरा सारखं कायदे या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालत आहे. लोकांचा बांधकाम क्षेत्रावर विश्वास वाढत आहे. यापूर्वी फसवणुकीचे अनेक प्रकार होत होते. त्याला मोठी चपराक बसली आहे. नोटबंदीनंतर काळापैशांचा ओघ कमी झाल्याने चांगल्या माणसांनी पण या क्षेत्रात नियमानुसार पैसा गुंतवला आहे. परिवर्तानाची नांदी सुरु आहे.

किंमती भडकण्याची शक्यता महागाईमुळे घराच्या किंमती अगोदरच भडकलेल्या आहेत. पण दोन हजारांची नोट बंद झाल्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. घराच्या किंमती वाढण्याची शक्यता पण वर्तविण्यात येत आहे. देशात अनेक प्रकल्प महागाईमुळे रखडले आहेत. ग्राहकच फिरकत नसल्याने विकासक चिंतेत आहेत. त्यात अशा घडामोडींचा परिणाम दिसू शकतो.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.