Currency Note : मोठी बातमी! नोटा गेल्या कुणा गावा, 88 हजार कोटी नोटा गायब, RTI मध्ये मोठा खुलासा

Currency Note : मोदी सरकारच्या दोन कार्यकाळात पहिल्यांदा नोटबंदी झाली आणि आता 19 मे रोजी 2000 रुपयांची नोट माघारी बोलविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. नोटांचे पुराण अजूनही थांबले नाही. 88 हजार कोटींच्या या नोटाच चलनातून गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..

Currency Note : मोठी बातमी! नोटा गेल्या कुणा गावा, 88 हजार कोटी नोटा गायब, RTI मध्ये मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 6:19 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या (PM Narendra Modi) दोन कार्यकाळात पहिल्यांदा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली होती. काळापैसा बाहेर काढण्यासाठी आणि दहशतवादाला होणारे फंडिंग रोखण्यासाठी नोटबंदीची सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता. या 19 मे रोजी 2000 रुपयांची नोट माघारी बोलविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. ती सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पण भारतीय नोटांचे पुराण अजूनही थांबले नाही. 88 हजार कोटींच्या या नोटाच चलनातून गायब (Mysterious Disappear) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आल्याने यंत्रणांचे धाबे दणाणले आहे.

या नोटा झाल्या गायब भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) 1999-2010 या काळात लॉकर्समध्ये जमा करण्यात आलेल्या 339.95 दशलक्ष अतिरिक्त नोटांची अडचण होती. कारण या रक्कमेच्या आकड्यांचा सिक्युरिटी प्रिटिंग प्रेसच्या आकड्यांशी ताळमेळ बसत नव्हता. पण आता तर मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे यंत्रणांचे धाबे दणाणले आहे. टाकसाळीत नवीन डिझाईनच्या 500 रुपयांच्या नोटा तयार करण्यात आला होता. 8,810.65 दशलक्ष नोटा तयार करण्यात आल्या होत्या. आरबीआयला यातील केवळ 7,260 दशलक्ष नोटा मिळाल्या आहेत. म्हणजे या नोटा चलनात आहेत. तर 88,032.5 कोटी नोटा गायब आहेत.

नोटा गेल्या कुणा गावा द फ्री प्रेस जर्नलमधील एका रिपोर्टनुसार, या नोटा कुठे गायब झाल्या याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. 1,760.65 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा गायब आहेत. एप्रिल 2015 ते मार्च 2016 पर्यंतच्या नाशिक प्रिटिंग प्रेसमध्ये मुद्रित 210 दशलक्ष नोटांचा यामध्ये समावेश आहे. गायब झालेल्या नोटांचे मुल्य 88,032.5 कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रवक्त्याने याप्रकरणात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

हे सुद्धा वाचा

येथे होते नोटांची छपाई

  1. भारतात तीन ठिकाणी नोटांची छपाई करण्यात येते
  2. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण (पी) लिमिटेड, बेंगळुरु
  3. करन्सी नोट प्रेस, नाशिक
  4. बँक नोट प्रेस, देवास

RTI मधून खुलासा आरटीआयमधून हा खळबळजनक खुलासा झाला. मनोरंजन रॉय यांनी आरटीआयअंतर्गत ही माहिती मागितली होती. नाशिक करन्सी नोट प्रेसद्वारा 375.450 दशलक्ष 500 रुपयांच्या नवीन नोटांचे मुद्रण करण्यात आले होते. परंतु, रिझर्व्ह बँकेकडील नोंदीनुसार, केवळ 345.000 कोटी नोटा मिळाल्या आहेत. या नोटा एप्रिल 2015 ते डिसेबर 2016 पर्यंत मुद्रित करण्यात आल्या होत्या.

RBI म्हणते 500 च्या नोटा नाही मिळाल्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण (पी) लिमिटेड, बंगळुरुने 2016-2017 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेला 5,195.65 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटांचा पुरवठा केला होता. बँक नोट प्रेस देवासने 1,953 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा छापल्या होत्या. भारतीय रिझर्व्ह बँकेला या प्रेसमधून केवळ नवीन डिझाईनच्या 7,260 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या. या तीनही प्रेसने एकूण 8,810.65 दशलक्ष नवीन डिझाईनच्या 500 रुपयांच्या नोटा छापल्या होत्या. पण आरबीआयच्या मते, त्यांना केवळ नवीन डिझाईनच्या 7,260 दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या.

केंद्रीय यंत्रणा करणार तपास हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. 1,760.65 दशलक्ष नोटा गायब होणे ही काही साधी गोष्ट नाही. सक्तवसूली संचालनालय आणि केंद्रीय आर्थिक गुप्तचर ब्युरोकडे याविषयीची रितसर तक्रार करण्यात आली. आता या दोन्ही यंत्रणा याप्रकरणात तपास करण्याची शक्यता आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.