Tata-Bisleri Deal : मोठी अपडेट! बोलणी फिस्कटली, कराराला ब्रेक

Tata-Bisleri Deal : ब्लूमबर्गच्या अहवालानुसार बिसलेरी आणि टाटातील बोलणी फिस्कटल्याची चर्चा आहे. या दोन कंपन्यांमधील बोलणीला ब्रेक लागला आहे. कंपनीच्या मूल्यांकनावरुन वाद उभा ठाकला आहे.

Tata-Bisleri Deal : मोठी अपडेट! बोलणी फिस्कटली, कराराला ब्रेक
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 10:55 AM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या मिनरल वॉटरच्या कराराला मोठा झटका बसला आहे. ही डील टाटा समूह आणि बिसलेरी इंटरनॅशनल (Tata and Bisleri Deal) यांच्या दरम्यान ही डील सुरु होती. या कराराला ब्रेक लागला आहे. देशातील सर्वात मोठी बाटलीबंद पाणी विक्री करणारी कंपनी बिसलेरी खरेदीसाठी टाटा समूहाने आघाडी घेतली होती. या दोन्ही समूहात बोलणी अंतिम टप्प्यात पोहचली होती. पण या कराराला अर्थात पैशांचा खोडा बसला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार (Bloomberg Report) बिसलेरी आणि टाटातील बोलणी फिस्कटल्याची चर्चा आहे. या दोन कंपन्यांमधील बोलणीला ब्रेक लागला आहे. कंपनीच्या मूल्यांकनावरुन वाद उभा ठाकला आहे.

हा करार अंतिम टप्प्यात असताना, कंपनीच्या मूल्यांकनावरुन वाद पेटला. बिसलेरी कंपनीला या डीलमधून (Deal Update) घसघशीत रक्कम मिळण्याची अपेक्षा होता. पण टाटा समूह बिसलेरीसाठी एवढी रक्कम मोजायला तयार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये आता रक्कमेवरुन बोलणी फिस्कटली आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या करारासंबंधी दोन्ही कंपन्यांमधील डीलसंबंधीची चर्चा बंद झाली आहे. या संपूर्ण डीलबाबत माहिती असणाऱ्या सूत्रांनुसार,ही डील कंपनीच्या मूल्यांकनावर अटकली. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्यांमध्ये या कराराबाबत बोलणी अंतिम टप्प्यात होती. रक्कम हस्तांतरीत करण्याविषयीचा आराखड्यावरही बोलणी झाल्याचे समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

मीडिया रिपोर्टनुसार, बिसलेरीच्या प्रमोटर्सला या करारातून एक अब्ज डॉलर मिळण्याची अपेक्षा होती. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्यांमध्ये मूल्यांकन करण्याविषयी सहमती झाली नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हा मुद्दा दोन्ही कंपन्या आपसी सामंजस्याने मिटवू शकतात. दोन्ही कंपन्यांमध्ये पुन्हा चर्चा होऊ शकते. बिसलेरी खरेदीसाठी इतर कंपन्याही पुढे येऊ शकतात. टाटा आणि बिसलेरीने या विषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बाटलीबंद मिनरल वॉटर मार्केटमध्ये बिसलेरीचा दबदबा आहे. बिसलेरीचा भारतीय बाजारात 60 टक्के वाटा आहे. बिसलेरीच्या संकेतस्थळानुसार, जयंतीलाल चौहान यांनी 1949 मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स तयार करणारी पारले समूहाची स्थापना केली होती. त्यांनी 1969 मध्ये इटलीतील एका उद्योजकाकडून बिसलेरी खरेदी केली होती. सध्या कंपनी हँड सॅनिटायझरही तयार करत आहे.

बिसलेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी नोव्हेंबरमध्ये दिलेल्या एका मुलाखतीनुसार, बिसलरी टाटा समूहाला विक्री करण्याची तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. या डीलमुळे टाटा समूहालाही मोठा फायदा होणार होता. बाटलीबंद पाणी विक्री व्यवसायात टाटाचा दबदबा वाढला असता. टाटा समूहाकडे अगोदरच हिमालियन नॅचरल मिनरल वॉटर आणि टाटा वॉटर प्लस ब्रँड आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.