Rule Change : आजपासून या नियमात बदल, तुमच्या खिशावर पडणार भार ?

साल 2024 संपले आहे. नवीन वर्षाच्या १ तारखेपासूनच अनेक दैनंदिन कामकाजाच्या गोष्टीचे नियम बदलले आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील होणार आहे. हे बदल 1 जानेवारीपासून लागू होत आहेत, त्यामुळे कोणते बदल होत आहेत आणि त्याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे ते पाहूयात...

Rule Change : आजपासून या नियमात बदल, तुमच्या खिशावर पडणार भार ?
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 1:25 PM

एक जानेवारीपासून नवीन वर्षे सुरु झाले आहे. या दिवसापासून केवळ वर्ष बदलले नसून दैनंदिन व्यवहारातील अनेक बदल झाले असून अनेक नियमात बदल झाला आहे. आता नवीन वर्षात नवीन खर्च वाढतील. नवे वर्षे नवे नियम घेऊन आले आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. हे बदल १ जानेवारीपासून लागू झाले आहेत. चला तर पाहूयात काय बदल झाले आहेत. आणि याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे.

आरबीआयच्या एफडीच्या नियमात बदल

आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ जानेवारीपासून NBFC ( नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी )आणि HFC ( हाऊसिंग फायनान्स कंपनी ) च्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) संदर्भातील अनेक महत्वाचे नियम बदलले आहेत. लिक्वड असेट्स ठेवण्याची टक्केवारी आणि डिपॉझिटचा विमा उतरविण्यासंबंधिचे नियम बदलले आहेत.

कारच्या किंमती वाढणार

नवीन वर्षात अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. यात मारुती सुझुकी, हुंडई, महिंद्र , मर्सिडिझ-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या कंपन्याचा समावेश आहे. या कंपन्यांनी सुमारे तीन टक्क्यांपर्यंत किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे.

हे सुद्धा वाचा

एलपीजीची किंमत

दर महिन्याला इंधन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेत असते. गेल्या काही महिन्यांपासून १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. परंतू १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडर आता ८०३ रुपयात मिळतो. परंतू घरगुती सिलिडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Amazon प्राईममध्ये बदल

Amazon इंडियाने १ जानेवारी २०२५ पासून आपल्या प्राईम मेंबरशिपमध्ये नियमात बदल केला आहे. आता एका अकाऊंटमधून केवळ दोन टीव्हीवर प्राईम व्हिडीओ स्ट्रीम केला जाऊ शकणार आहे. आधी पाच डिव्हाईसपर्यंत स्ट्रीमिंगची अनुमती दिली होती. आता अधिक टीव्हीवर स्ट्रीमिंगकरण्यासाठी अतिरिक्त सदस्यत्व घ्यावे लागणार आहे.

GST पोर्टलमध्ये बदल

१ जानेवारीपासून GST काही महत्वपूर्ण बदल होत आहेत. या ई-वे बिलची डेडलाईन आणि GST पोर्टलची सुरक्षे संदर्भात बदल होणार आहेत. नवीन नियम लागू झाल्याने खरेदीदार, विक्रेते आणि ट्रान्सपोर्टरना समस्या निर्माण होऊ शकतात.

पेन्शनवर काय परिणाम

ईपीएफओने १ जानेवारीपासून पेन्शनच्या नियम सोपे बनविले आहेत. आता कर्मचारी आपल्या पेन्शनच्या रकमेला कोणत्याही बँकेतून काढू शकणार आहेत. यासाठी कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज नाही.

FD च्या नियमात बदल

फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये देखील बदल होणार आहे. तर १ जानेवारीपासून जमा रकमेला मॅच्युरिटीच्या आधी काढण्याच्या नियमात बदल झाला आहे. खासकरुन हे बदल NBFCs आणि HFCs जोडलेले असतील.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.