एलपीजीपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत, देशात झाले हे बदल, काय परिणाम होईल तुमच्या खिशावर?

Big Change from 1 June 2024 : देशात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला बदल दिसून येतो. आजपासून जून महिना सुरु होतो. या महिन्यात अनेक बदल होत आहे. 1 तारखेपासून एलपीजी, क्रेडिटा कार्ड, वाहन परवानासंबंधी बदल होत आहे.

एलपीजीपासून ते क्रेडिट कार्डपर्यंत, देशात झाले हे बदल, काय परिणाम होईल तुमच्या खिशावर?
एक तारखेपासून अनेक बदल
Follow us
| Updated on: Jun 01, 2024 | 12:38 PM

जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अनेक बदल होत आहे. 1 जूनपासून तुमच्या खिसावर या बदलाचा थेट परिणाम दिसून येईल. एलपीजी सिलेंडर, क्रेडिट कार्डचे नियम, वाहन परवाना तसेच इतर अनेक बदल झाले आहेत. या बदलाचा सर्वसामान्य नागरिकावर परिणाम होईल. त्यांना या बदलाचा फायदा होणार आहे.

LPG च्या किंमती झाल्या कमी

तेल विपणन कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. 1 जून 2024 रोजी त्यात बदल दिसून आला. नवीन दर कंपन्यांनी जाहीर केले आहे. IOCL च्या संकेतस्थळानुसार, सातत्याने तिसऱ्या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत कपात करण्यात आली. 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 72 रुपयांपर्यंतची कपात झाली आहे. यावेळी 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल दिसून आला नाही.

हे सुद्धा वाचा

आज सकाळीच ऑईल कंपन्यांनी लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालापूर्वी ही आनंदवार्ता दिली. ताज्या बदलामुळे 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 1 जून रोजी दिल्लीत 69.50 रुपयांनी, कोलकत्तामध्ये 72 रुपयांनी, मुंबईत 69.50 रुपये तर चेन्नईत 70.50 रुपयांनी स्वस्त झाला.

हवाई प्रवास झाला स्वस्त

जून महिन्याच्या सुरुवातीलाच हवाई प्रवासाबाबत आनंदवार्ता येऊन धडकली. निवडणुकीच्या निकालानंतर हवाई प्रवास स्वस्त होईल. देशातील चारही महानगरांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधन प्रति किलोलिटर 51.1 डॉलरने स्वस्त झाले आहे. 1 जून रोजी ऑईल कंपन्यांनी जेट फ्यूल म्हणजेच एअर टर्बाइन फ्यूल (एटीएफ) च्या किंमतीत मोठी कपात केल्याने विमान भाडे कमी झाले आहे. देशातंर्गत प्रवास यामुळे स्वस्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय मार्गांसाठीही जेट इंधनाच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. देशातील चारही महानगरांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधन प्रति किलोलिटर 51.1 डॉलरने कमी झाले आहे.

एसबीआय क्रेडिट कार्ड

1 जूनपासून तिसरा मोठा बदल झाला. क्रेडिट कार्डच्या नियमात बदल झाला. कार्डच्या वापरकर्त्यांसाठी हा बदल झाला. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक, एसबीआयने, क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केला आहे. एसबीआयच्या काही क्रेडिट कार्डवर व्यवहार केल्यानंतर रिवॉर्ड मिळणार नाही. पॉईंट मिळणार नाही. यामध्ये ऑरम, एलिट, अँडव्हांटेज, कार्ड प्लस, सिम्पलीक्लिक आणि इतर कार्डवर आता रिवॉर्ड मिळणार नाहीत.

ड्रायव्हिंग लायसान्स टेस्ट

जून महिन्याच्या एक तारखेपासून वाहन परवानासंबंधी मोठा बदल झाला आहे. आजपासून खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट होऊ शकेल. RTO मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ही चाचणी होईल.

Aadhaar Card मोफत अपडेट

जून महिन्यातील 14 तारखेपासून हा बदल लागू होईल. UIDAI ने आधार कार्डच्या मोफत सुविधेची मर्यादा वाढवली आहे. आता 14 जूनपर्यंत नागरिकांना त्यांच्या आधार कार्डमध्ये बदल करता येईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.