M S Dhoni : 800 कोटींच्या मालकिण शीला सिंह आहेत तरी कोण? महेंद्र सिंह धोनी पण घेतो आशिर्वाद
M S Dhoni : सध्या शीला सिंह यांची चर्चा जोरात सुरु आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी पण त्यांचा आशिर्वाद घेतो. त्या 800 कोटींच्या मालकिण आहेत. एमएस धोनी यांच्या प्रोडक्शन कंपनीशी त्यांचे काय नाते आहे?
नवी दिल्ली : कॉर्पोरेट जगतात एक नवीन नावाची जोरदार चर्चा आहे. शीला सिंह (Sheila Singh) यांचे नाव सध्या चर्चेत आहेत. त्या 800 कोटींच्या मालकिण आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचे कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट टीमचे पूर्व कॅप्टन महेंद्र सिंह धोनी (M S Dhoni) हे पण त्यांचे पाया पाडतात. धोनीची एकूण संपत्ती जवळपास 1000 कोटी रुपयांच्या घरात आहे. शीला सिंह आहे तरी कोण? महेंद्र सिंह धोनी यांच्याशी त्यांचे नाते आहे तरी काय. 800 कोटींच्या मालकिण असलेल्या शीला सिंह यांचे एमएस धोनी यांच्या प्रोडक्शन कंपनीशी काय नाते आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
धोनीची सासू शीला सिंह या एमएस धोनीची सासू आहे. पत्नी साक्षीची ती आई आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनी यांच्या एंटरटेनमेंट लिमिटेडचे व्यवस्थापन शीला सिंह यांच्या हातात आहे. त्या या कंपनीच्या सीईओ आहेत. धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केवळ चारच वर्षांत 800 कोटींची उलाढाल केली आहे. सध्याच्या स्थितीत साक्षी धोनीकडे एमएस धोनी प्रोडक्शन हाऊसचे सर्वाधिक शेअर आहेत.
धोनीची प्रोडक्शन कंपनी मीडिया रिपोर्टनुसार, शीला सिंह या मल्टी-बिलियन-डॉलर कंपनीचे व्यवस्थापन पाहतात. 2020 मध्ये साक्षी धोनी आणि तिची आई शीला सिंह या दोन्ही धोनी एंटरटेनमेंट प्राईव्हेट लिमिटेडच्या अग्रस्थानी आहेत. या दोघींच्या टीमच्या नेतृत्वात एमएस धोनीचे प्रोडक्शन हाऊसने मोठे यश मिळवले आहे. या कंपनीने मोठी झेप घेतली आहे. या कंपनीने नवीन प्रकल्प हाती घेतले आहे. शीला सिंह या कंपनीच्या पहिल्या सीईओ आहेत.
कंपनीची संपत्ती सुसाट मीडिया रिपोर्टनुसार, धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केवळ चारच वर्षांत 800 कोटींची उलाढाल केली आहे. सध्याच्या स्थितीत साक्षी धोनीकडे एमएस धोनी प्रोडक्शन हाऊसचे सर्वाधिक शेअर आहेत. धोनीने अनेक व्यवसायात आणि प्रोडक्शन कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. धोनीची एकूण संपत्ती जवळपास 1000 कोटी रुपयांच्या घरात आहे.
हॉकी क्लबची मालक साक्षी सिंह रावत आणि एमएस धोनी पहिल्यांदा 2007 मध्ये एका सामन्यादरम्यान भेटले. कोलकत्त्यात त्यांची भेट झाली होती. त्यावेळी साक्षी ताज बंगाल हॉटेलमध्ये इंटर्न म्हणून काम करत होती. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसह साक्षी, धोनीसह रांची रेज हॉकी क्लबची सहमालकिण आहे. इन्स्टग्राम आणि ट्विटर या सोशल प्लॅटफॉर्मवर ती सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 4.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.