Rupees Trade Policy : रुपयात जागतिक व्यापार! तुम्हाला बसेल धक्का, इतक्या देशांनी उघडले वोस्ट्रो खाते

Rupees Trade Policy : केंद्र सरकारच्या Rupee Trade Policy ला परदेशातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत अनेक देशांनी या योजनेत रुची दाखवली आहे. तर काही देशांनी थेट वोस्ट्रो खातेच उघडले आहे.

Rupees Trade Policy : रुपयात जागतिक व्यापार! तुम्हाला बसेल धक्का, इतक्या देशांनी उघडले वोस्ट्रो खाते
रुपया धाकड
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 6:40 PM

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपया (Rupees) आजही मोठ्या पिछाडीवर आहे. पण मोदी सरकारने आता रुपयाला बळ देण्याचे ठरवले आहे. रुपया डॉलरच्या (Dollar) तुलनेत कमजोर असला म्हणून काय झाले. रुपयालाच जागतिक व्यापारात चलन म्हणून पर्याय ठरविण्याची मोदी सरकारची (Modi Government) खेळी यशस्वी होताना दिसत आहे. डॉलरऐवजी रुपयातून व्यापार करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) योजना आखली आहे. या योजनेला यशही मिळाले आहे. जवळपास 50 देशांनी भारतीय रुपयांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यास अनुकूलता दाखवली आहे. या देशांनी त्यासाठी वोस्ट्रो खाते (Vostro Account) ही उघडले आहे. त्यामुळे आता या देशांना व्यापार करताना डॉलरची गरज नाही. ते भारतीय रुपयांत सहज व्यापार करु शकतात.

भारतीय सरकारी वृत्तसंस्था पीटीआयने विषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, आतापर्यंत 49 देशांनी भारतीय रुपयात व्यवहार करण्यासाठी खाते उघडली आहेत. तर इतर अनेक देशांना परवानगीची प्रतिक्षा आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास हा आकडा मोठ्या संख्येने वाढणार आहे. या खात्यांचा उद्देश रुपयाच्या माध्यमातून परदेशी व्यापार वाढवण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. भारतात 49 देशांनी वोस्ट्रो खाते उघडले, त्यात रशिया, मॉरीशस, श्रीलंका, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, इजराईल आणि जर्मनी येथील बँकाचा समावेश आहे. हे देश आता रुपयात व्यवहार करत आहेत.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात रुपयाविषयीची महत्वकांक्षी योजना सुरु केली होती. ज्या देशात अमेरिकन डॉलरची गंगाजळी कमी आहे. अशा देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी भारतीय रुपयांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे या देशांना भारतीय रुपयांमध्ये व्यापारी सौदे आणि व्यवहार पूर्ण करता येतील, सेटलमेंट पूर्ण करता येईल.

हे सुद्धा वाचा

या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीलाच RBI ने आतापर्यंत 18 वास्त्रो खाते (Vostro Accounts) सुरु केली आहेत. यामध्ये रशियासाठी 12, श्रीलंकेसाठी 5 तर मॉरिशससाठी 1 खात्याचा समावेश आहे. या तीन देशांमध्ये भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरता येणार आहे. आता या संख्येत सातत्याने इतर देशांची भर पडत आहे.

असा होईल परिणाम

  1. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार रुपयामध्ये केल्यास, रुपयाचे महत्व वाढेल.
  2. आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाची घसरण थांबवता येईल.
  3. इतर चलनांपेक्षा भारतीय रुपयाची घसरण डॉलरच्या मुकाबल्यात कमी आहे.
  4. रुपयाचा वापर झाल्यास आयात खर्चात कपात होईल.
  5. सध्या रशिया आणि भारताचा व्यापार रुपयातच होत आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.