Rupee Bank : आरबीआयकडून रुपी बँकेचा परवावा रद्द; बँकेत अडकल्या कोट्यवधीच्या ठेवी

आर्थिक अडचणीत सापडलेल्या रुपी बँकेवर (Rupee Bank) अखेर भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून (RBI) कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रुपी बँकेचा परवाना (License) रद्द करण्यात आला आहे. 

Rupee Bank : आरबीआयकडून रुपी बँकेचा परवावा रद्द; बँकेत अडकल्या कोट्यवधीच्या ठेवी
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 8:31 AM

पुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या रुपी बँकेवर (Rupee Bank) अखेर भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून (RBI) कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रुपी बँकेचा परवाना (License) रद्द करण्यात आला आहे.  22 सप्टेंबरनंतर या कारवाईची अंमलबजावणी होणार असून, त्यानंतर रुपी बँकेला कोणतेही बँकिंग व्यवहार करता येणार नसल्याचे आरबीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. रुपी बँकेवर झालेल्या या कारवाईमुळे ठेविदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या बँकेत ठेविदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रुपीच्या विलिनीकरण प्रस्तावाला देखील तत्त्वत: मंजुरी देण्यात आली होती. मात्र  दरम्यानच्या काळात विमा ठेव सुरक्षा महामंडळाच्या निर्णयानुसार 64 हजार ठेवीदारांनाच त्यांच्या ठेवीची पाच लाखांपर्यंतची किंवा त्यापेक्षा कमी रक्कम देण्यात आली. या रकमेचा एकूण आकडा हा 700 कोटी रुपये इतका होता, त्यामुळे  ज्या बँकेत विलीनीकरण होणार होते, त्या बँकेने या  प्रस्तावाला नकार दिला. अखेर आता रुपी बँकेवर आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

ठेविदारांमध्ये चिंतेचं वातावरण

दरम्यान रुपी बँकेवर ( भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या वतीने या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.  22 सप्टेंबरनंतर या कारवाईची अंमलबजावणी होणार असून, त्यानंतर रुपी बँकेला कोणतेही बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे ठेवीदारांची चिंता वाढली आहे. या बँकेत हजारो ठेविदारांच्या कोट्यवधीच्या ठेवी अडकलेल्या आहेत. समजा जर एखाद्या बँकेवर अशी कारवाई झाली तर सरकारी नियमानुसार ठेविदारास त्याने बँकेत ठेवलेली पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळते.

हे सुद्धा वाचा

आरबीआय कारवाई केव्हा करते?

जर एखाद्या बँकेच्या व्यवहारात अनियमिता आढळून येत असेल किंवा संबंधित बँकांनी  जर आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास या बँकांना कारणे दाखवा नोटीस पाठवून कारवाई करण्यात येते. शक्यतो अशा बँकावर दंडात्मकच कारवाई केली जाते. त्याचा ग्राहकांच्या व्यवहारावर काही परिणाम होत नाही. मात्र काही गंभीर प्रकरणात आरबीआयकडून बँकेचा परवाना देखील रद्द केला जातो.  परवाना रद्द केल्यास बँकांना नंतर पुढे आर्थिक व्यवहार करता येत नाहीत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.