Russia Oil Import | रशिया झाला भारताचा टॉप ऑईल सप्लायर, येणार का पेट्रोल स्वस्ताई

Russia Oil Import | एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान रशिया हा भारताचा सर्वात मोठा कच्चा तेलाचा पुरवठादार ठरला. त्यानंतर इराक आणि सौदी अरबचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला रशियाचा वाटा केवळ दोन टक्के होता. तो वाढून आता 40 टक्क्यांवर पोहचला आहे. तर इराक आणि सौदी अरबकडे भारताने जणू पाठ फिरवली आहे.

Russia Oil Import | रशिया झाला भारताचा टॉप ऑईल सप्लायर, येणार का पेट्रोल स्वस्ताई
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 7:25 PM

नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : आखाती देशात सध्या भारताच्या भूमिकेचीच चर्चा सुरु आहे. सध्या मध्य-पूर्व देशात, आखाताजवळ इस्त्राईल-हमास युद्ध भडकले आहे. आखातीतील देशांनी हमासची, पॅलेस्टाईनची बाजू उचलून धरली आहे. हा भाग अशांत झाल्याने हे देश नाराज झाले आहेत. पण त्यांना सर्वाधिक धक्का या युद्धापेक्षा भारताच्या भूमिकेने बसला आहे. भारताने आखाती देशांचे तेल काढले आहे. कच्चा तेलासाठी भारताने आतापर्यंत याच देशांना पसंती दिली होती. पण गेल्या एक वर्षांपासून भारताने पसंती क्रम बदलवला आहे. गेल्या सहा महिन्यात तर भारताने आखाती देशाकडे जणू पाठ फिरवली आहे. रशियाला सर्वाधिक पसंती दिली आहे.

रशियाचा दबदबा

भारताच्या क्रूड ऑईल बास्केटमध्ये आतापर्यंत आखाती देशांचा एकछत्री अंमल होता. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर समीकरणं बदलली. रशिया भारताला स्वस्तात कच्चे तेल देण्यास तयार झाला. त्याचा फायदा भारतीय कंपन्यांना काही प्रमाणात झाला. रशिया अजून ही भारताला इतर देशांपेक्षा स्वस्तात इंधनाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे या बास्केटमध्ये रशियाचा वाटा एकदम वाढला आहे. तर आखाती देशाकडील आयात एकदम रोडावली आहे.

हे सुद्धा वाचा

असा वाढला वाटा

भारताने यंदा एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत सरासरी 1.76 दशलक्ष बॅरल प्रति दिवस अशा प्रमाणात रशियाकडून इंधनाची खरेदी केली. तर गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण 7,80,000 बॅरल प्रति दिवस असे होते. आकडेवारीनुसार जुलै ते ऑगस्ट या दरम्यान भारताने रशियाकडील तेल आयात कमी केली होती.

मध्य-पूर्वेतील देशांना फटका

एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात मध्य-पूर्वेतील देशांपेक्षा भारताने कच्चा तेलासाठी रशियाला प्राधान्य दिले आहे. इराक आणि सौदी अरबकडे कमी मागणी नोंदवली आहे. इराक आणि सौदी अरबकडील तेलाची आयात क्रमशः 12 टक्के आणि 23 टक्क्यांनी घसरली आहे. ती 928,000 प्रति बॅरलवरुन 607,500 बॅरलपर्यंत घसरली आहे. या दरम्यान मध्यपूर्वेतील तेलाची आयात 28 टक्क्यांनी कमी झाली आहे.

येणार का स्वस्ताई?

कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आखाती देशांच्या तुलनेत रशियाचे कच्चे तेल 10 ते 15 डॉलर प्रति बॅरलने स्वस्त पडत आहे. सप्टेंबर महिन्यातील एका रिपोर्टनुसार, भारत रशियाकडून 80 डॉलर प्रति बॅरलने कच्चा तेलाची खरेदी करत आहे. अमेरिकेतील ब्रेंट क्रूड ऑईलच्या तुलनेत जवळपास ते 13 ते 14 डॉलरने स्वस्त आहे. या घडामोडींचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्यावर होईल का? केंद्र सरकार दर कपातीचे गिफ्ट देईल का याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.