Russia Ukraine Crisis : इन्फोसिस रशियामधून आपला व्यवसाय गुंडाळणार, युक्रेनला 10 लाख डॉलरची मदत
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर (Russia Ukraine Crisis) भारतातील प्रमुख आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने (Infosys) एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने रशियामधून (Russia) आपला व्यवसाय गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. याबाबत कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, इथून पुढे कंपनी रशियाच्या कोणत्याच क्लाइंटसोबत काम करणार नाही.
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर (Russia Ukraine Crisis) भारतातील प्रमुख आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसने (Infosys) एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने रशियामधून (Russia) आपला व्यवसाय गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. याबाबत कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, इथून पुढे कंपनी रशियाच्या कोणत्याच क्लाइंटसोबत काम करणार नाही. कंपनीच्या सीईओंनी याबाबत बोलताना म्हटले की, इन्फोसिस लवकरच रशियामधील आपल्या कंपनीचे कार्यालये इतर देशात हलवणार आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत भारताची भूमिका वेगळी आहे. भारत सरकारने या युद्धात कोणाचेही समर्थन केले नाही. भारत आतापर्यंत निपक्ष राहिला आहे, मात्र कंपनीची भूमिका वेगळी आहे. कंपनीने युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियामधील आपला व्यवसाय इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
इन्फोसिसने रशियामधून व्यवसाय हलवण्याचा निर्णय का घेतला?
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीर भारताने निपक्ष भूमिका घेतली आहे. भारताने रशियाचे समर्थन देखील केले नाही, तसेच विरोध देखील केला नाही. रशियाकडून युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्याचा भारताने विरोध करावा तसेच रशियासोबत सुरू असलेला व्यापर बंद करावा यासाठी अमेरिकेकडून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र भारताने या दबावाला न जुमानता व्यवहार सुरूच ठेवला आहे. मात्र दुसरीकडे इन्फोसिसचा व्यवसाय जसा रशियामध्ये आहे, तसेच व्यवसायाचे जाळे अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांमध्ये देखील पसरले आहे. त्यामुळे भविष्यातील धोके लक्षात घेऊन, कंपनीने रशियामधून काढता पाय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
कार्यलयांचे इतर ठिकाणी स्थलांतर
कंपनीचे सीईओ सलिल पारेख यांनी याबाबत बोलताना सांगितले की, सध्या रशियामध्ये असलेल्या इन्फोसिसच्या कार्यालयाचे स्थलांतर इतर देशात करण्यास सुरुवात झाली आहे. रशियामध्ये कंपनीचे फार मोठे जाळे नाही. रशियामध्ये केवळ कंपनीचे 100 कर्मचारी आहेत. मात्र तरी देखील कंपनी आपले रशियामधील कार्यालये इतर ठिकाणी हलवणार आहे. तसेच इथून पुढे रशियाच्या कोणत्याही क्लाइंटसोबत इन्फोसिस काम करणार नाही. कंपनीकडून युक्रेनला मदत निधी म्हणून 10 लाख डॉलरची मदत करण्यात येणार आहे. केवळ इन्फोसिसच नाही तर जगातील अनेक आयटी कंपन्या सध्या रशियामधून काढता पाय घेत आहेत.