रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर होईल गंभीर परिणाम, 30% पर्यंतचा निचांक गाठू शकतो शेअर बाजार

जर रशिया -यूक्रेन जास्त दिवस चालू राहिल्यास या युध्दाचा परिणाम भारतावर देखील पाहायला मिळू शकतो. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकधारकांची रणनीती फोल ठरू शकते.

रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर होईल गंभीर परिणाम, 30% पर्यंतचा निचांक गाठू शकतो शेअर बाजार
Russia Ukraine War चा विपरित परिणाम होण्याची शक्यताImage Credit source: Twitter Video Snap
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 6:07 PM

रशिया आणि यूक्रेन (Russia Ukraine Conflict) या दोन्ही देशात अद्याप युद्ध चालू आहे. अर्थव्यवस्था अगदी नाजूक परिस्थिती असताना युक्रेन वर हल्ला केला गेेला. हल्ली प्रत्येक देश कोरोना महामारीच्या चकाट्यातून स्वतः ला बाहेर काढत आहे.रशिया युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युध्दाचा विपरीत परिणाम भारत समवेत जगभरातील अन्य बाजारांवर देखील पडला आहे. या दोन्ही देशांच्या वादामुळे आधीच कच्च्या तेलांच्या (Crude Oil) किंमतीने 112 डॉलर प्रति बॅरेल पार केले आहे. भारतीय शेअर बाजरातील स्थितीने निचांक गाठला आहे. तज्ञ मंडळीचे असे म्हणणे आहे की,जर रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद असाच सुरू राहिला तर या सगळ्या परिस्थितीचा विपरीत परिणाम भारतावर होऊ शकतो. महागाई वाढू शकते. शेअर बाजारात(Stock Market) गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकधारकांची रणनीती फोल ठरू शकते.

180 डॉलर प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात कच्चा तेलाचे भाव

इंडेक्सजिनियस इन्वेस्टमेंट एडवाइजर चे सीएमटी अमित हरचेकर यांनी टीवी 9 शी बातचीत करताना सांगितले की, यूक्रेन- रशिया यांच्यातील वाढलेल्या तणावामुळे येणाऱ्या दिवसांत ब्रेंट क्रूडचे भाव 180 डॉलर प्रति डॉलर पर्यंत पोहचू शकतील. गेल्या अनेक वर्षापासून अनेकांची अशी धारणा होती की, कच्च्या तेलाची किंमती बियर मार्केटमध्ये आहे परंतू एक्टिवेटिंग (1+4) ब्रेकआउट बरोबरच बुल मार्केट मध्ये स्थानांतरित झाले आहे.(1+4) ब्रेकआउटचे महत्व अधिक असते. WTI क्रूड आणि ब्रेंट क्रूड दोघांच्या किंमती 110 डॉलर प्रति बॅरल पार झाली आहे आणि येणाऱ्या महिन्यात 180 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती मध्ये वाढ झाल्यामुळे आम आदमी सोबतच सरकार वर सुद्धा याचे ओझे वाढणार आहे.

भारताविरुद्ध निर्बंध लागण्याची जोखीम

हरचेकर यांनी सांगितले की,रशिया सोबतच मजबूत आणि अतूट संबंध याचा परिणाम भारताविरुद्ध देखील पाहायला मिळू शकतो. भारताविरुद्ध निर्बंध लागण्याचा धोका वाढलेला आहे. यूक्रेन रशिया युद्धानंतर भारत रशिया विरोधात कोणतीही भूमिका घेण्यास असमर्थ ठरलेला आहे. भारतातील 60 टक्के संरक्षण सामग्री रशियाद्वारे निर्मित केले जातात आणि संरक्षण उद्योगामधील अनेक जॉइंट व्हेंचर देखील आहेत, आतापर्यंत पश्चिमेकडील राष्ट्राने भारताविरोधात कोणतेच कडक पाऊल उचलले नाहीये. परंतु, भविष्यातील संकटे वाढू शकते.

2 लाख कोटी रुपयांपेक्षा केली अधिक विक्री

रिपोर्ट नुसार , गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीय माध्यमांमध्ये आक्रमक प्रचार पाहायला मिळाला. भारत आता एफआईआई प्रवाह वर अवलंबून नाही आणि घरेलू गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजार यांना मदत करण्यास पुढे आलेले आहेत त्यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांमध्ये फॉरेन इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्स (FII) ने कॅश मार्केटमध्ये दोन लाख करोड रुपयेपेक्षा जास्त विक्री केलेली आहे तसेच डोमेस्टिक इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्स (DII) आणि रिटेल निवेशकों (Retail Investors) ने इंडेक्सला 17,000 वर निर्देशांक ठेवण्यासाठी त्यांची खरेदी केली.

30 % पर्यंत घसरू शकतो बाजार 

इंडिया विक्स इंडेक्स (India VIX Index) ऑप्शन किमतींवर आधारित एक वोलेटिलिटी इंडेक्स आहे. इंडिया विक्स इंडेक्स सिस्टम मध्ये जोखमीचे संकेत देते आणि जेव्हा सुद्धा इंडिया विक्स इंडेक्स 22 ने वर ट्रेड करतो तेव्हा मंदी बाबत आपल्याला सतर्क राहायला हवे. हर्चेकर यांनी सांगितले की, भारतीय बाजारामध्ये निफ्टी पीआर इनवर्स इंडेक्स (Nifty PR inverse Index) आणि इंडिया विक्स यांच्यात मोठा इशारा देण्यात आला आहे. Nifty50 PR 1X Inv Index NSE मध्ये ट्रेड केले जाणारे इंडेक्स आहे जे निफ्टी 50 इंडेक्स चे रिवर्स रिटर्न प्रदान करतो.

Russia Ukraine War politics: झेलेन्सिकीला घालवून पुतीनना यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण हवंय? एका नावाची जोरदार चर्चा

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताचा दुसरा बळी, आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

Russia Ukrane War : युक्रेनच्या “भुतानं” रशियाला झपाटलं, रशियाच्या 6 फाइटर जेटचा केला भुगा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.