नव्या कारसाठी तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार? रशिया-यूक्रेन युद्धामुळे चिपची कमतरता

मूडीज अॅनालिटिक्सच्या एका अहवालात चिपची कमतरता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ऑटो सेक्टरच्या सेलवरही परिणाम दिसून येईल. चिप संकटामुळे सणांच्या काळात वाहनांना मोठी मागणी असूनही वाहनांच्या विक्रीवर मोठा परिणाम पाहायला मिळाला होता. इतकंच नाही तर चिपच्या कमतरतेमुळं इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल फोनच्या मार्केटवरही मोठा परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

नव्या कारसाठी तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार? रशिया-यूक्रेन युद्धामुळे चिपची कमतरता
कार विक्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 8:09 AM

मुंबई : तुम्ही नवी कोरी कार खरेदी करु इच्छित असाल तर तुम्हाला नव्या कारसाठी अजून वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. कारण रशिया यूक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) जागतिक स्तरावर आधीच बाधीत असलेली पुरवठा साखळी प्रभावित होण्याची शक्यता आहे. यात सर्वात मोठा परिणाम सध्याच्या चिप संकटावर (Semiconductor chip crisis) पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मूडीज अॅनालिटिक्सच्या एका अहवालात चिपची कमतरता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ऑटो सेक्टरच्या (Automobile Sector) सेलवरही परिणाम दिसून येईल. चिप संकटामुळे सणांच्या काळात वाहनांना मोठी मागणी असूनही वाहनांच्या विक्रीवर मोठा परिणाम पाहायला मिळाला होता. इतकंच नाही तर चिपच्या कमतरतेमुळं इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल फोनच्या मार्केटवरही मोठा परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम

मूडीज एनालिटिक्सच्या एका रिपोर्टनुसार रशिया आणि यूक्रेन दरम्यान सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम चिपच्या पुरवठ्यावर होणार आहे. कच्च्या मालाच्या पुरवठ्यात या दोन्ही देशांचा महत्वाचा वाटा आहे. सेमीकंडक्टर बनवण्यासाठी या कच्च्या मालाचा वापर होतो. पॅलेडियमच्या जागतिक पुरवठ्यात एकट्या रशियाचा वाटा 44 टक्के, तर निऑनच्या पुरवठ्यात यूक्रेनचा 70 टक्के वाटा आहे. या दोन्हींचा वापर चिप बनवण्यासाठी केला जातो. रशिया आणि यूक्रेनमधील युद्ध अधिक काळ चाललं तर चिपचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता मूडीजच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. पॅलेडियम आणि निऑन हे सेमीकंडक्टर चिपच्या निर्मितीत प्रमुख घटक आहेत. या घटकाचा वापर ऑटो, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स अशाजवळपास सर्वच महत्वाच्या उद्योगात केला जातो.

चिपच्या पुरवठ्यात सुधारणा दिसत असतानाच…

चिपच्या पुरवठ्याची स्थिती सुधारत असल्याचं चित्र दिसत असतानाच रशिया-यूक्रेन युद्धाला सुरुवात झाली. सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेमुळं ऑटोमोबाईल कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम पाहायला मिळतोय. त्यामुळे जानेवारी 2022 मध्ये प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीय वार्षिक 10 टक्क्यांनी घट झाली होती. दरम्यान, फेब्रुवारीमध्ये यात सुधारणा दिसत होती. त्यामुळे मारुतीने आपल्या एका निवेदनात म्हटलं होतं की, चिपचा पुरवठा चांगला राहिल्यास कंपनी या आर्थिक वर्षात 2018 – 19 मध्ये झालेली पातळी गाठू शकते. असं असतानाच आता रशिया-यूक्रेन युद्धामुळे पुन्हा एकदा चिपच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे वाहनांच्या विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबईत उभारले देशातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर, 5G नेटवर्क बरोबरच खूप साऱ्या मिळतील सुविधा !

आता आणखी एक भारतीय स्टार्टअप कंपनी आयपीओ आणणार; 2023 च्या सुरुवातीला ‘मीशोचा’ आयपीओ मार्केटमध्ये!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.