Russia-Ukraine war : भारतीय स्टील उद्योगाची चांदी; निर्यात 76 टक्क्यांनी वाढली
अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर घातलेल्या आर्थिक निर्बंधांचा मोठा प्रभाव हा जागतिक बाजरपेठेवर दिसून येत आहे. युद्धामुळे बदलेले हे नवे समीकरण भारतातील स्टील उद्योगाच्या (Indian Steel Industry) पथ्यावर पडताना दिसून येत आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश आहे.
रशिया आणि युक्रनेमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाला 19 दिवस झाले. या युद्धामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली. दरम्यान दुसरीकडे अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर घातलेल्या आर्थिक निर्बंधांचा मोठा प्रभाव हा जागतिक बाजरपेठेवर दिसून येत आहे. युद्धामुळे बदलेले हे नवे समीकरण भारतातील स्टील उद्योगाच्या (Indian Steel Industry) पथ्यावर पडताना दिसून येत आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश आहे. भारतामध्ये स्टील उत्पादन मोठ्याप्रमाणात होते. मात्र तरी देखील निर्यातीचे प्रमाण कमी आहे. दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये भारतापेक्षा स्टीलचे उत्पादन कमी होते, मात्र त्यांचा निर्यातीमधील (Steel Export Market) वाटा हा भारतापेक्षा अधिक आहे. रशिया आणि युक्रेनकडून युरोप आणि मध्य पूर्वेकडील देशांना स्टीलची निर्यात केली जाते. मात्र युद्धामुळे (Russian Ukraine War) स्टीलची निर्यात ठप्प झाल्याने, भारतामधून होणारी स्टीलची निर्णयात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
युक्रेनकडून 45 मिलियन टन स्टीलची निर्यात
युक्रेन वार्षिक आधारावर 44-45 मिलियन टन स्टीलची निर्यात करते. तर रशिया एकट्या युरोपीय राष्ट्रांना दरवर्षी 14-15 मिलियन टन स्टील निर्यात करतो. मात्र युक्रेन, रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीयन राष्ट्रांनी घातलेल्या निर्बंधांमुळे रशियामधील स्टील निर्यातीला ब्रेक लागला आहे. जवळपास तीस टक्के स्टीलची निर्यात मंदावली आहे. तज्ज्ञांच्या मते जरी युद्ध समाप्त झाले तरी देखील निर्यात पूर्वपदावर येण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधील लागू शकतो. अशा स्थितीमध्ये आपली निर्यात वाढवण्याची भारताकडे एक मोठी संधी आहे.
भारतामधून स्टीलची निर्यात वाढली
पुरवठा साखळी खंडित झाल्याने स्टील महाग झाले आहे. युरोपमधून भारतात निर्माण होणाऱ्या स्टीलला मागणी वाढू लागली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात भारताच्या स्टील निर्यातीमध्ये तब्बल 76 टक्क्यांची वाढ झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात भारताने 11.57 लाख टन स्टील निर्यात केले आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये स्टील निर्यातीचे प्रमाण अवघे 6.55 लाख टन एवढेच होते. मात्र इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे गेल्या वर्षी जागावर कोरोनाचे संकट होते. कोरोनाकाळात जवळपास सर्वच व्यापार ठप्प झाला होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व्यापार, उद्योगाला देखील चालना मिळाली आहे.
Home Loan Tax Benefits : होम लोनवर टॅक्स वाचवण्याचे तीन सोपे उपाय, दीड लाखांपर्यंत होऊ शकतो फायदा
आर्थिक अडचणीमध्ये गुंतवणुकीवर कर्ज घेणे कितपत फायदेशीर?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
तुम्हालाही ऑनलाईन कर्ज हवे आहे? मग ही फिनटेक कंपन्यांची ‘डिजिटल दादागिरी’ एकदा बघाच