Sahara India : गुंतवणूकदारांना ‘सहारा’, असा मिळेल पैसा, सोपी आहे प्रक्रिया

Sahara India : सहारा परिवारात अडकलेली गुंतवणूक परतण्याचा मार्ग एकदाचा मोकळा झाला. गेल्या अनेक वर्षानंतर गुंतवणूकदारांना आधार मिळाला. त्यांचा अडकलेला पैसा परत मिळेल. त्यासाठी अशी सोपी आहे प्रक्रिया..

Sahara India : गुंतवणूकदारांना 'सहारा', असा मिळेल पैसा, सोपी आहे प्रक्रिया
ये रे ये रे पैसा
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 1:42 PM

नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : सहारा परिवारात (Sahara Parivar) अडकलेली गुंतवणूक परतण्याचा मार्ग एकदाचा मोकळा झाला. गेल्या अनेक वर्षानंतर गुंतवणूकदारांना आधार मिळाला. त्यांचा अडकलेला पैसा परत मिळेल. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सहारा रिफंड पोर्टलचे (Sahara Refund Portal) आज उद्धघाटन केले. या पोर्टलवर सहारा गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत मिळेल. देशातील कोट्यवधी ग्राहकांचा पैसा सहारामध्ये अडकला होता. त्यातील काही गुंतवणूकदार तर हयात ही नाहीत. उत्तर भारतासह पश्चिम बंगालपर्यंत गुंतवणूकदारांचे मोठे जाळे होते. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेशातील अनेक गुंतवणूकदारांचा (Investors) पैसा अडकला होता. हे पोर्टल सुरु झाल्याने सहारा मधील पैसा परत मिळण्याची आशा वाढली आहे.

4 कोटी गुंतवणूकदारांना फायदा

अमित शाह यांनी पोर्टलचे आज उद्धघाटन केले. चार कोटी लोकांना या पोर्टलचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहारा रिफंड पोर्टलमार्फत 5000 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यात येतील. हा पैसा परत घेण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी कोर्टात धाव घेतली होती. सीबीआयपासून अनेक केंद्रीय यंत्रणांनी याप्रकरणात चौकशी केली. अनेक वर्षानंतर गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळेल.

हे सुद्धा वाचा

आता परत मिळेल पैसा

सर्वोच्च न्यायालयीत न्यायमूर्तींच्या समितीने याप्रकरणी तोडगा काढला. त्यानुसार, गुंतवणूकदारांना आता त्यांची रक्कम परत मिळणार आहे. लोकांच्या घामाचा पैसा परत मिळेल. ही प्रक्रिया पारदर्शक असल्याचे अमित शाह म्हणाले.

किती दिवसात रक्कम

चार सहकारी समित्यांकडील डेटा ऑनलाईन आहे. पोर्टलवर 1.7 कोटी गुंतवणूकदारांना यामुळे नोंदणी करणे सोपे होईल. या गुंतवणूकदारांच्या दाव्यांचा लवकरच निपटारा करण्यात येईल. 45 दिवसांच्या आता रक्कम गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होईल.

अशी सोपी प्रक्रिया

  • गुंतवणूकदारांना या रिफंड पोर्टलवर अगोदर नोंदणी करावी लागेल. गुंतवणूक केल्यानंतर मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे, त्यांना मोठा दिलासा मिळेल. नोंदणी केल्यानंतर या गुंतवणूकदारांचा पडताळा करण्यात येईल. गुंतवणूकदारांकडे गुंतवणुकीसंबंधीचे जी कागदपत्रे आहेत. तिचा पडताळा करण्यात येईल. 30 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
  • ही प्रक्रिया झाल्यावर ऑनलाईन क्लेम करता येईल. 15 दिवसांत गुंतवणूकदारांना SMS येईल. त्यानंतर लागलीच गुंतवणूकदारांच्या खात्यात सहाराकडून रक्कम जमा करण्यात येईल. सहारात रक्कम गुंतवणूक केल्याविषयीचे सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.
  • सहारा समूहातील सहारा क्रेडिट को-ओपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी, हमारा इंडिया क्रेडिट को-ओपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमधी गुंतवणूकदारांना हा दिलासा मिळणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.