EPF Salary Limit Update | कर्मचाऱ्यांची वेतन मर्यादा वाढणार, पीएफमधील योगदानही वाढेल
EPF Salary Limit Update | वेतन मर्यादा वाढल्यास देशातील 7.5 कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल. पीएफमधील योगदानही त्यामुळे वाढेल.
EPF Salary Limit Update | देशातील कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतंर्गत (EPFO) एका उच्च स्तरीय समितीने वेतन मर्यादा (Salary Limit) वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे (Employees) वार्षिक वेतन एक लाखांच्या घरात वाढण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रस्ताव
सध्या वेतन मर्यादा 15,000 रुपये करण्यात आली आहे. या उच्च स्तरीय समितीने दिलेल्या प्रस्तावानुसार, आता ही वेतन मर्यादा 21,000 रुपये प्रति महिना करण्यात येणार आहे.
पूर्वलक्षी प्रभावाने होईल लागू
समितीने दिलेल्या या प्रस्तावावर केंद्र सरकार मंजुरीसाठी विचार करत आहे. विशेष म्हणजे मंजुरी देताना ती पूर्वलक्षी प्रभावाने देण्याचा म्हणजेच मागील तारखेपासून लागू करण्याचा विचार होऊ शकतो.
कोणाला होईल फायदा ?
हा प्रस्ताव लागू झाल्यास देशभरातील जवळपास 7.5 लाख अतिरिक्त कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल. कारण त्यांना या योजनेचा थेट फायदा होईल. इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रस्ताव स्वीकारला गेल्यास जास्त खर्चाची तरतूद करु इच्छिणाऱ्या काही नियोक्ते लागलीच त्याची अंमलबजावणी करतील.
कंपन्यांनी केली होती मागणी
कोरोना महामारीत बजेट बिघडल्याने नियोक्त्यांनी वेतन मर्यादा वाढवण्याची मागणी उचलून धरली होती.
सरकारलाही फायदा
ही योजना मंजूर झाल्यास, सरकारलाही दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकार सध्या कर्मचारी पेन्शन योजनेसाठी दरवर्षी 6,750 कोटी रुपये अदा करते. केंद्र सरकार EPFO अंशदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या मूळ वेतनाच्या 1.16 टक्के योगदान देते.
समान मापदंड असावेत
ईपीएफओच्या संचालक मंडळाने (Central Board of Trustees of EPFO) EPFO आणि ESIC या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी समान मापदंड ठेवण्याचीही शिफारस केली आहे.