Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sania Mirza Net Worth : टेनिसपटू सानिया मिर्झाच्या नावे अनेक रेकॉर्ड, इतक्या संपत्तीची आहे मालकीण, याठिकाणी आहे हवेली

Sania Mirza Net Worth : टेनिसस्टार सानिया मिर्झा आहे इतक्या संपत्तीची मालकीण

Sania Mirza Net Worth : टेनिसपटू सानिया मिर्झाच्या नावे अनेक रेकॉर्ड, इतक्या संपत्तीची आहे मालकीण, याठिकाणी आहे हवेली
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 6:05 PM

नवी दिल्ली : लाखो हृदयांवर अधिराज्य करणारी टेनिसपटू सानिया मिर्झाने (Tennis Star Sania Mirza) टेनिसमध्ये मैदान गाजवले आहे. सानियाने नुकतेच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दुखापतीमुळे सानियाने हा निर्णय जाहीर केला आहे. सानिया तिचा शेवटचा सामना दुबईत पुढील महिन्यात खेळेल. टेनिस चॅम्पियनशीपमध्ये ती खेळणार आहे. 36 वर्षांची सानिया मिर्झा दुहेरी सामान्यात जागतिक स्तरावर क्रमांक एकवर होती. सानिया मिर्झा कोट्यवधींच्या संपत्तीची ( Net Worth) मालकीण आहे. दोन दशकांहून अधिक काळापासून भारताचे प्रतिनिधित्व करताना तीने मैदान गाजवले आहे.

सानिया मिर्झाला अर्जुन पुरस्कार(2004), पद्म श्री पुरस्कार (2006), राजीव गांधी खेळ रत्न अवॉर्ड(2015), पद्म भुषण पुरस्कार(2016) मिळाला आहे. सानियाला आतापर्यंत 6 मोठ्या स्पर्धांमध्ये पदके मिळाली आहे. अनेक स्पर्ध तिने गाजविल्याच नाही तर जिंकल्या आहेत.

दुहेरी सामन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (2016), विम्बलडन (2015), युएस ओपन (2015) यामध्ये पदक मिळवले आहे. याशिवाय संमिश्र सामान्यात सानियाने तीन ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन (2009), फ्रेंच ओपन (2012) आणि युएस ओपन (2014) या स्पर्धेत चांगली कामगिरी बजावली आहे.

हे सुद्धा वाचा

अहवालानुसार, 2022 पर्यंत सानिया मिर्झाची एकूण संपत्ती 25 दशलक्ष डॉलर (जवळपास 200 कोटी ) इतकी होती. यामध्ये सामान्यातील पुरस्कारची एकूण रक्कम आणि जाहिरातीच्या मिळकतीचा हिस्सा आहे. WTA टूरमधून सानियाने जिंकलेल्या रक्कमेतून एकूण 69,63,060 डॉलरची कमाई केली आहे.

सानिया मिर्झा हैदराबाद येथे एका आलिशान हवेलीत राहते. दुबईमध्ये पण तिचे एक घर आहे. तिच्याकडे अलिशान कार आहेत. सानिया BMW X3 आणि Porsche Carrera GT या कारचे मालक आहेत. मर्सिडीज बेंज, ऑडी आणि रेंजर रोवर या अलिशान कारही तिच्या ताफ्यात आहेत.

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.