SBI चा ग्राहकांना इशारा, ‘ही’ माहिती शेअर करताना करा विचार, अन्यथा अकाऊंटमध्ये पैसे होतील गायब
जर तुम्ही कोणतीही खासगी माहिती एखाद्याबरोबर शेअर केली तर तुमचे अकाऊंट खाली होऊ शकते. (SBI Bank alert)
मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 44 कोटींहून अधिक ग्राहकांना सावध केलं आहे. SBI ने ग्राहकांनी तुमचा वैयक्तिक तपशील कोणासोबतही शेअर करु नका, असा सल्ला दिला आहे. सर्व ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्यापर्यंतच ठेवावी. तसेच कोणताही बँकिंग फ्रॉड झाल्यास सायबर पोलिसांना तातडीने कळवा, असे ट्वीट SBI ने केले आहे. याबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आली आहे. (SBI Bank alert customers for digital transactions)
ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटनांमध्येही वाढ
देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर डिजीटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. त्यासोबतच ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर SBI ने आपल्या ग्राहकांना ऑनलाईन फ्रॉड होण्यापासून वाचवण्यासाठी सतर्क केले आहे. SBI ने केलेल्या ट्वीटनुसार, सर्व ग्राहकांनी त्यांची वैयक्तिक माहिती ही त्यांच्याकडे ठेवा. इतर कोणालाही ही माहिती देताना विचार करा. यामुळे तुमच्या खात्यातील पैसे सुरक्षित राहतील, अशी माहिती SBI ने दिली आहे.
Mr. Thinkeshwar keeps his personal information private! He always thinks twice before sharing anything with anyone. Please report cyber-crimes on – https://t.co/UPv14uX3YV #SBI #StateBankOfIndia #MrThinkeshwar #OnlineBanking #DigitalFrauds #ThinkBeforeYouShare pic.twitter.com/WQfIENA3FK
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 20, 2021
खासगी माहिती सार्वजनिक करु नका
एसबीआयने केलेल्या ट्वीटनुसार, Mr. Thinkeshwar हे त्यांची खासगी माहिती नेहमी गुप्त ठेवतात. कोणतीही खासगी माहिती इतरांना देतेवेळी ते दोनदा विचार करतात. तसेच जर अशाप्रकारची कोणतीही घटना घडल्यास कृपया https://cybercrime.gov.in वर तक्रार करा.
ही माहिती शेअर करु नका
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी कोणालाही पॅन कार्ड (PAN Card) माहिती, आयएनबी प्रमाणपत्रे, मोबाइल नंबर, यूपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन आणि यूपीआय व्हीपीए सांगू चुकूनही सांगू नका. जर तुम्ही कोणतीही खासगी माहिती एखाद्याबरोबर शेअर केली तर तुमचे अकाऊंट खाली होऊ शकते.
कर्जाच्या नावाखाली फसवणूक
दरम्यान सद्यस्थितीत कर्जाच्या नावाखाली बँकेत फ्रॉड केले जात आहे. जर तुम्हाला SBI Loan Finance Ltd या नावे कोणताही फोन आला तर काळजी घ्या. हा फोन बनावट असू शकतो. याचा SBI शी काहीही संबंध नाही. अशा फेक कॉल द्वारे ते बनावट कर्जाच्या ऑफर देत आहेत, असेही SBI ने सांगितले आहे.
BEWARE SBI CUSTOMERS!
If you are contacted by SBI Loan Finance Ltd. or any such entities then be informed that these are not associated with SBI. They are giving fake loan offers in order to scam our customers pic.twitter.com/tb0rbDPs1G
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 20, 2021
या संबंधित फोनद्वारे ग्राहकांना कर्जाच्या विशेष ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होऊ शकता. SBI Loan Finance Ltd अशी कोणतीही कंपनी SBI बँकेशी संबंधित नाही. (SBI Bank alert customers for digital transactions)
संबंधित बातम्या :
Gold: अबब! कोरोनाच्या संकटकाळातही भारतात इतक्या टन सोन्याची आयात
Saral Pension Yojana : फक्त एकदाच करा पेमेंट आणि आयुष्यभर मिळेल पेंशन, प्रीमियमही मिळेल रिटर्न
राज्यांना दररोज 700 टन ऑक्सिजन पुरवठा करतेय रिलायन्स; 70 हजार रुग्णांचे वाचणार प्राण