SBI Free Accidental Insurance: नवी दिल्ली: तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक त्यांच्या 40 कोटी ग्राहकांसाठी 20 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा जारी करणार आहे. याबद्दल तुम्हाला माहिती नसल्यास ही बातमी वाचा. स्टेट बँक त्यांच्या ग्रारकांना एटीएमकार्ड ( डेबिट कार्ड) वर मोफत अपघात विमा काझत आहेत.त्याला कंम्पलीमेंटरी इंन्शुरन्स कवर नाव देण्यात आलं आहे. (Complimentary insurance cover available on SBI Debit Card). स्टेट बँकेच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं डेबिट कार्ड आहे, हे पाहावे लागेल. (SBI debit card free accidental insurance cover up to 20 lakh)
जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात रस्ते अपगातात जीव गमावाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जगामध्ये एक टक्के लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात होतो. जागतिक पातळीवर भारताची टक्केवारी 11 टक्के आहे. स्टेट बँकेच्या मोफत अपघात विम्याची माहिती घेतली असता रस्ते अपघातात मृत्यू होणारांना 10 लाख तर विमान दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांना 20 लाख रुपये देण्यात येतील. मात्र, याचे निकष तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं डेबिट कार्ड आहे. यावर ठरणार आहे. अपघातापूर्वी 90 दिवसांमध्ये एटीएम कार्डचा वापर करुन एकतरी व्यवहार झालेला आवश्यक आहे.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी साडेचार लाख अपघात होतात. त्यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. देशाला प्रत्येक तासाला 53 अपघात होतात.तर, चार मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. 2011-2020 मध्ये भारतात 13 लाख लोकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला होता. तर 50 लाख लोक जखमी झाले होते. यामुळे भारतात अपघात विम्याची गरज इतरा देशांपेक्षा जास्त असते. तर, अपघातांमध्ये 5.96 लाख कोटी रुपयांचं नुकसान दरवर्षी होते. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये 18 ते 45 वर्षे वयामधील लोकांचा समावेश असतो.
टीप: या योजनेच्या अधिक माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला भेट देऊन नियम वाचा.
आपल्या व्हॅलेंटाईन किंवा पत्नीला ATM कार्ड देण्यापूर्वी काळजी घ्या; अन्यथा मोठं नुकसान#SBIATM #SBIATMwithdrawalruleshttps://t.co/7OubJx7Bak
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 13, 2021
संबंधित बातम्या:
SBI, HDFC बँक, ICICI आणि BOB ची स्पेशल FD ऑफर, जाणून घ्या डिटेल्स
आपल्या व्हॅलेंटाईन किंवा पत्नीला ATM कार्ड देण्यापूर्वी काळजी घ्या; अन्यथा मोठं नुकसान
(SBI debit card free accidental insurance cover up to 20 lakh)