SBI, HDFC, ICICI : 30 जूनची डेडलाईन लक्षात ठेवा, अन्यथा FD अधिक लाभांश नाही मिळणार
आपण आपण या कॅटेगरीत येत असाल आणि एफडी करण्याचा विचार करीत असाल तर 30 जूनपर्यंत आपण याचा लाभ घेऊ शकता. (SBI, HDFC, ICICI bank, Remember June 30 deadline, otherwise FD will not get more dividend)
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील काही आघाडीच्या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर विशेष ऑफर दिल्या होत्या. या ऑफर अंतर्गत एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी एफडीवर ज्यादा व्याज योजना चालविली होती. या कालावधीत त्यांना इतर दिवसांपेक्षा एफडीवर 0.80 टक्के अधिक व्याज मिळत आहे. यापूर्वी या ऑफरची अंतिम मुदत 31 मार्च 2021 होती, जी 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली. एफडीमध्ये गुंतवणुकीचा कल वाढविण्यासाठी आणि कोरोना संकटात ज्येष्ठ नागरिकांना अधिकाधिक लाभ देण्यासाठी बँकांनी ही ऑफर दिली होती. आता ही सुविधा 30 जून रोजी संपणार आहे. आपण आपण या कॅटेगरीत येत असाल आणि एफडी करण्याचा विचार करीत असाल तर 30 जूनपर्यंत आपण याचा लाभ घेऊ शकता. (SBI, HDFC, ICICI bank, Remember June 30 deadline, otherwise FD will not get more dividend)
काय आहे एसबीआयची योजना?
एसबीआय विशेष योजना ‘Wecare Deposit’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर अधिक व्याज ऑफर केले जात आहे. एसबीआयमधील सामान्य नागरिकांसाठी एफडीवर वर्षाकाठी 5.4 टक्के व्याज मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना सामान्य एफडीपेक्षा तुलनेने 0.50 टक्के अधिक व्याज मिळते. दुसरीकडे जर आपण ‘Wecare Deposit’ योजनेंतर्गत एफडी केली तर ज्येष्ठ नागरिकांना 0.30 टक्के ज्यादा व्याज मिळेल. म्हणजेच त्यांना एफडीवर वार्षिक 6.20 टक्के व्याज मिळेल. अशा प्रकारे एसबीआय Wecare Deposit चा लाभ घेत मिळवून ज्येष्ठ नागरिक आपल्या एफडीवर 0.80 (0.50 + 0.30) अतिरिक्त व्याज मिळवू शकतात.
काय आहे एचडीएफसी बँक योजना?
एचडीएफसी बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एचडीएफसी सीनियर सिटीझन केअर योजनादेखील आहे. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर 6.25 टक्के व्याज मिळते, जे सामान्यपेक्षा 0.75 टक्के जास्त आहे.
काय आहे आयसीआयसीआय बँकेची योजना?
आयसीआयसीआय बँकेच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयसीआयसीआय बँक गोल्डन ईअर योजना सध्या सुरू आहे. या योजनेत बँक ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30 टक्के व्याज देत आहे. हे सामान्यपेक्षा 0.80 टक्के जास्त आहे.
जाणून घ्या योजनेची वैशिष्ट्ये
60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आहे. जर तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळणार नाही. नवीन व्याज खाते उघडणे किंवा जुने एफडी नूतनीकरण या दोन्ही बाबींवर अधिक व्याजाचा लाभ मिळेल. बँकांची ही योजना 30 जून 2021 पर्यंत खुली आहे. (SBI, HDFC, ICICI bank, Remember June 30 deadline, otherwise FD will not get more dividend)
‘मोदींची हिटलरशी तुलना अयोग्य, हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता’, नितीन राऊतांना खोचक टोला https://t.co/qn6852P68T @NitinRaut_INC @narendramodi @INCMaharashtra @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil #NarendraModi #NitinRaut #AdolfHitler #GDPDrop #Economy
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2021
इतर बातम्या
भारतात धुमाकूळ घालण्याऱ्या कारची पाकिस्तानकडून कॉपी, चिनी कंपनीकडून विक्री
या दोन ऑनलाईन सेवांसाठी एसबीआय आकारते इंटरनेट बँकिंग शुल्क, प्रति ट्रान्झॅक्शन 50 रुपये चार्ज