Car Loan: चारचाकीचं स्वप्न लवकरच सत्यात; या बँकांचे व्याजदर सर्वात कमी
Car loan Interest rate: चारचाकीचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते. या तीन बँकांचे चारचाकी कर्ज स्वस्त आहे. त्यांचा व्याजदर ही कमी आहे. त्यामुळे चारचाकीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल.
जून महिन्यात रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये (Repo Rate) 50 बेसिस पॉईंटची (Basis Points) वाढ केली होती. त्यामुळे रेपो रेट वाढून तो 4.9 टक्क्यांवर पोहचला होता. त्याचा परिणाम गृहकर्ज (Home Loan) आणि वाहन कर्जावर (Auto Loan) दिसून आला. सध्यस्थितीतील आणि जून्या ग्राहकांना त्याचा फटका बसला. त्यांच्या कर्जाचे व्याजदर वाढले आहेत. आता त्यांना पहिल्यापेक्षा अधिक ईएमआय (EMI) म्हणजे हप्ता चुकवावा लागणार आहे. रेपो रेटमध्ये वाढ होताच, बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली. त्यामुळे व्याजदर (Interest Rate) पहिल्यापेक्षा अधिक वाढले. कर्ज घेताना व्याजदर एकतर एकाच दराने स्थिर ठेवता येतात किंवा बदलत्या धोरणानुसार बदलते व्याजदराचा पर्याय निवडता येतो. निश्चित व्याजदर (Fixed Interest Rate) हा एकाच दराने शेवटपर्यंत कायम राहतो. त्यावर व्याजदर कमी झाले अथवा वाढले त्याचा परिणाम होत नाही. तर फ्लोटिंग रेट (Floating Rate) हे कमी जास्त होत राहतात. त्यामुळे कारचे स्वप्न साकारण्यासाठी या तीन बँकांच्या कर्ज व्याजदरावर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.
SBI वाहन कर्ज
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा ऑटो लोनचा ग्राहक फार मोठा आहे. बँक ऑन रोड किंमतीच्या 90 टक्के कर्ज मंजुरी देत आहे. नवीन कार खरेदी करण्यासाठी बँक 7 वर्षांच्या मुदतीवर कर्ज मंजूर करत आहे. मल्टी युटिलिटी व्हेकल आणि एसयुवीसाठी ही हाच कालावधी निश्चित करण्यात आला आहे. एसबीआय कार लोन, एनआरआय कार लोन आणि एस्योर्ड कार लोन योजनेसाठी 7.65 ते 8.35 टक्के दरम्यान व्याजदर निश्चित करण्यात आाला आहे.
पीएनबी वाहन कर्ज
पंजाब नॅशनल बँकेचे ऑटो लोन हे रेपो लिंक्ड लेंडिंग रेट सोबत जोडलेले आहे. तसेच हे कर्ज जोखीमयुक्त प्रकारातील असल्याने बँक जोखीम हप्ता म्हणून बीएसपी सेवा लागू करते. पंजाब नॅशनल बँकेने सध्यस्थितीतील 6 जून 2022 रोजी पासून आणि नवीन ग्राहकांसाठी व्याजदरात वाढ केली आहे. व्याजदर 6.90 टक्क्यांहून वाढवून ते 7.40 टक्के करण्यात आले आहे. यामध्ये रेपो रेट 4.90 टक्के, मार्क फी 2.50 टक्के यांचा समावेश आहे. यासोबतच 25 बीएसपी सेवेतंर्गत लागू आहे.
आयसीआयसीआय बँक कर्ज
खासगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआय बँकेने 16 जून 2022 रोजी पासून चारचाकी ची नवीन व्याजदर लागू केली आहेत. जर तुम्ही 12 ते 35 महिन्यांसाठी कार लोन घेणार असाल तर 8.80 टक्क्यांपासून व्याजदर सुरु होईल. 36 ते 38 महिन्यांच्या व्याजासाठी 8.3 टक्के दराने व्याज आकारण्यात येईल. 39 ते 96 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.85 टक्के व्याजदर लागू आहे. व्याजदर हे ग्राहकाचा सिबिल स्कोर आणि कारचे मॉडेल यावर ठरणार आहे.