एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांना झटका, कर्जदरात वाढ झाल्याने हप्ता महागला, जाणून घ्या कसा होणार परिणाम

देशातला सर्वात मोठा ग्राहक वर्ग ज्या बँकेशी जोडला गेला आहे त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांचा कर्जाचा हप्ता महागला आहे.

एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांना झटका, कर्जदरात वाढ झाल्याने हप्ता महागला, जाणून घ्या कसा होणार परिणाम
स्टेट बँक Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 9:35 PM

मुंबई, देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. बँकेकडून कर्ज घेणे आता महाग झाले आहे (Expensive Loan) . बँकेने निधी आधारित कर्ज दर (MCLR) मध्ये 25 बेस पॉइंट्सची वाढ केली आहे. MCLR मध्ये ही वाढ सर्व मुदतीसाठी करण्यात आली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन MCLR दर 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहेत.

MCLR दरात वाढ केल्यानंतर दर एक महिना व तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 7.35 टक्क्यांवरून 7.60 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तसेच सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 7.65 टक्क्यांवरून 7.90 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दुसरीकडे, एका वर्षाच्या कालावधीसाठी दर 7.70 टक्क्यांवरून 7.95 टक्के करण्यात आला आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी कर्जाचा दर 7.90 टक्क्यांवरून 8.15 टक्के झाला आहे. तर, तीन वर्षांच्या कालावधीसाठी MCLR 8 टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्यात आला आहे.

MCLR म्हणजे काय?

MCLR किंवा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट हा किमान दर आहे ज्यावर बँका ग्राहकांना कर्ज देऊ शकतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2016 मध्ये MCLR आणला, ज्याद्वारे विविध प्रकारच्या कर्जांचे व्याजदर निश्चित केले जातात. बँकांना कर्ज देण्यासाठी हा अंतर्गत संदर्भ दर आहे. बँक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत MCLR लिंक्ड होम लोन देत होती.

हे सुद्धा वाचा

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर एक्सटर्नल बेंचमार्क आणि एमसीएलआर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच, रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेपो रेट किंवा बँकांना अल्प मुदतीच्या कर्जाच्या दरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. यासह रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईला तोंड देण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

रेपो दरात वाढ आणि MCLR वाढल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्जाचे दर वाढले आहेत. यामुळे कर्जाचा हप्ता वाढेल, सोबतच व्याजदरही वाढतील. फ्लोटिंग व्याज दर बेंचमार्क दराशी जोडलेले आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, फ्लोटिंग रेट गृह कर्जे बाह्य बेंचमार्क दराशी जोडलेली आहेत.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.