Bank : बँकेत कशाला जाताय, नवीन SBI टोल फ्री नंबर आलाय ना, डायल करा नी घरबसल्या या सेवा मिळवा..
Bank : स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना सोयी-सुविधा देण्यासाठी नवीन टोल फ्री क्रमांक प्रसिद्ध केला आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांचा सर्व्हिस सेंटर क्रमांक (Service Centre) अपडेट केला आहे. त्यामुळे आता आठवडाभर आणि 24 तास ग्राहकाला बँकिंग सोयी-सुविधेची माहिती मिळेल. या नवीन टोल फ्री क्रमांकावरुन (Toll Free Number) ग्राहकाला 24 तास 30 हून अधिक आर्थिक सुविधा मिळतील.
SBI च्या कॉल सेंटरवर ग्राहकांना आता 30 हून अधिक सेवा मिळतील. विशेष बाब म्हणजे, या सर्व सेवा ग्राहकांना घर बसल्या मिळणार आहे. त्यासाठी बँकेत लाबंच लांब रांगेमध्ये उभे राहण्याची गरज नाही. बँकेला सुट्टी असेल त्यादिवशीही तुम्हाला सुविधा मिळेल. आठवड्यातील सात दिवस आणि 24 तास ग्राहकांसाठी ही सुविधी उपलब्ध आहे.
सध्या एसबीआयच्या कॉल सेंटरवरुन देशातील 12 विविध भाषेत ग्राहकांना सोयी-सुविधा देण्यात येतात. यामध्ये हिंदी, इंग्रजी, तेलुगू, बंगाली, तमिल, कन्नड, मराठी, मल्यालम, उडिया, गुजराती, असमिया आणि पंजाबी भाषांचा समावेश आहे.
हा टोल फ्री क्रमांक अत्यंत सोपा असावा आणि ग्राहकांना सहज लक्षात ठेवता यावा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी योग्य क्रमांकाची निवड करण्यात आली आहे. हा टोल फ्री क्रमांक सोप्या चार आकड्यांमध्ये देण्यात आला आहे.
1800-1234 अथवा 1800-2100 या टोल फ्री क्रमांकावर ग्राहकाला त्याच्या बँकिंग सेवाविषयी माहिती घेता येईल. ग्राहकांना 30 हून अधिक सेवा मिळतील. या सर्व सेवा ग्राहकांना घर बसल्या मिळणार आहे. त्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
SBI च्या माहितीनुसार, टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांना अनेक सुविधांचा लाभ घेता येईल. यामध्ये खात्याशी संबंधित सेवा, एटीएम कार्ड आणि चेक बूक, अत्यावश्यक सेवा, यामध्ये एटीएम कार्ड आणि डिजिटल खाते ब्लॉक करणे, एसबीआयच्या उत्पादनाची माहिती देण्यात येणार आहे.
एसबीआयच्या संकेतस्थळानुसार “कृपया एसबीआयच्या 24X7 हेल्पलाइन क्रमांकावर म्हणजेच 1800 1234 (टोल-फ्री), 1800 11 2211 (टोल-फ्री), 1800 425 3800 (टोल-फ्री), 1800 2100 (टोल-फ्री) अथवा 080-26599990 वर कॉल करता येईल.”