टाटा आणि अंबानी यांना मागे टाकत सर्वात पुढे SBI; 5 दिवसांत केली इतकी कमाई

गेल्या आठवड्यात देशातील दोन दिग्गज मोठ्या कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि TCS च्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. त्यामुळे या कंपन्यांचा मार्केट कॅप पण कमी झाला. तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ला मोठा फायदा झाला. त्यामुळे बँकेने महसूलात हनुमान उडी घेतली.

टाटा आणि अंबानी यांना मागे टाकत सर्वात पुढे SBI; 5 दिवसांत केली इतकी कमाई
एसबीआयची दमदार कामगिरी
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 4:30 PM

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्सनी गेल्या पाच दिवसांत जबरदस्त कामगिरी बजावली. त्यामुळे मार्केट कॅपआधारे मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्या कंपन्यांना एसबीआयने मागे टाकले. देशातील 10 कंपन्यांमध्ये एसबीआयने आघाडी घेतली. तर यादीत ICICI Bank ने दुसरा क्रमांक पटकावला आहे. देशातील टॉप 10 कंपन्यांमधील 6 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 1.30 लाख कोटी रुपयांहून अधिकची वाढ दिसून आली.

चार कंपन्या फटका

चार कंपन्यांना कमाईत फटका बसला. त्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण दिसून आली. आकड्यांनुसार, मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज या आठवड्यात घसरणीत पहिल्या क्रमांकवर होती. तर टाटा समूहातील सर्वात मोठी कंपनी TCS ला पण नुकसान सहन करावे लागले. देशातील टॉप 10 मधील 4 कंपन्यांचे मार्केट कॅप 50 हजार कोटी रुपयांहून अधिकची घसरण दिसून आली.

हे सुद्धा वाचा

या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ

  1. गेल्या आठवड्यात देशातील टॉप 10 कंपन्यांमधील 6 कंपन्यांचे मार्केट कॅप 1,30,734.57 कोटी रुपयांनी वाढले.
  2. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेचे मूल्य या काळात 45,158.54 कोटी रुपयांनी वाढले. ते 7,15,218.40 कोटी रुपये झाले.
  3. देशातील दुसरी सर्वात मोठी बँक आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप 28,726.33 कोटींनी वाढले. ते आता 7,77,750.22 कोटी रुपये झाले.
  4. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यापैकी एक भारती एअरटलेचा महसूल 20,747.99 कोटींनी वाढला. भांडवल आता 7,51,406.35 कोटींच्या घरात पोहचले.
  5. देशातील FMCG कंपन्यांपैकी एक ITC चे बाजारातील भांडवल 18,914.35 कोटी रुपयांनी वाढले. कंपनीचे भांडवल आता 5,49,265.32 कोटी झाले आहे.
  6. भारतीय जीवन विमा निगमचे (LIC) बाजारातील भांडवल 9,487.5 कोटी रुपयांनी वाढले. आता मार्केट कॅप 6,24,941.40 कोटी रुपये झाले आहे.
  7. देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी Infosys च्या महसूलात 7,699.86 कोटींची वाढ झाली. कंपनीचे मार्केट कॅप 5,93,636.31 कोटी रुपयांवर पोहचले.

गुंतवणूकदारांना लागली लॉटरी

गेला आठवडा शेअर बाजारासाठी खास राहिला. सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या बाजारातील भांडवलात 1.30 लाख कोटी रुपयांची उसळी दिसली. या कालावधीत देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी एसबीआयला सर्वात मोठा फायदा झाला. त्यामुळे एसबीआयच्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. आठवडाभरातच शेअरहोल्डर्सनी 45,000 कोटी रुपयांची कमाई केली. तर रिलायन्सच्या शेअरधारकांना नुकसान सहन करावे लागले.

फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?
राज ठाकरेंच्या हातून 'रेल्वे इंजिन' जाणार? पक्षाची मान्यता धोक्यात?.
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?
मंत्रिपदासाठी लॉबिंग, भाजपसह शिंदे अन् दादांच्या वाट्याला किती पदं?.
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.