Corona : लॉकडाऊनदरम्यान एसबीआयकडून एफडीवरील व्याजदरात कपात
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँकेने लॉकडाऊन दरम्यान फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज दर कमी केले आहेत.

मुंबई : कोरोना विषाणूच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँकेने (SBI Reduce FD Intrest Rate) लॉकडाऊन दरम्यान फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज दर कमी केले आहेत. शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 75 बेसिक पॉईंटने कमी करुन 4.4 टक्के करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर (SBI Reduce FD Intrest Rate) एसबीआयनेही एफडीवरील व्याज दर घटवले.
नव्या व्याज दरांनुसार, ज्या ग्राहकांची भारतीय स्टेट बँकेत 1 ते 10 वर्षांपर्यंतची एफडी असेल, त्यांना 5.7 टक्के व्याज मिळेल. तसेच, ज्यांची 180 दिवस ते 1 वर्षाची एफडी असेल त्यांना 5 टक्के व्याज मिळेल. तर, 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.5 टक्के व्याज मिळेल आणि 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.5 टक्के व्याज मिळेल.
एकाच महिन्यात एसबीआयने दोनदा व्याजदरात कपात केली आहे. गेल्या 10 मार्चलाही एसबीआयने व्याज दरात कपात केली होती.
VIDEO : Delhi Lockdown : संचारबंदीतही दिल्लीत DTC बससेवा सुरूच, नागरिकांची प्रचंड गर्दी https://t.co/7aIAxDjDX7
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 28, 2020
एफडी हे व्याज कमवण्याचे गुंतवणुकीचे (SBI Reduce FD Intrest Rate) सर्वात चांगले माध्यम समजले जाते. मात्र, कोरोनामुळे एशबीआयने त्यांच्या व्याज दरात कपात केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिक पॉईंट अधिक व्याज मिळेल, असंही बँकेने सांगितलं. तसेच, हे नवे व्याजदर 2 कोटींपेक्षा कमी एफडीवर लागू असेल.
तीन महिन्यांपर्यंतचे सर्व टर्म लोनच्या EMI सस्पेंड
आरबीआयने बँकांसाठी तीन महिन्यांच्या मोरेटोरियमला मंजूरी दिल्यानंतर एसबीआयने म्हटले, सर्व मुदतीच्या कर्जाचे ईएमआय तीन महिन्यांसाठी आपोआप निलंबित केले जातील. यामुळे, आपल्या कार कर्जाचे, होम लोनचे आणि वैयक्तिक कर्जाचे ईएमआय तीन महिन्यांसाठी पुढे ढकलले जातील.
एसबीआय चे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सीएनबीसी टीव्हीला सांगितले की, कर्जाच्या मुदतीच्या कर्जाचा हप्ता तीन महिने पुढे ढकलला जाईल. त्यासाठी ग्राहकांना (SBI Reduce FD Intrest Rate) अर्ज करण्याची गरज नाही.