एसबीआयच्या व्याजदरात कपात, घर खरेदीदारांना दिलासा
मुंबई : भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) कर्जांवरील व्याजदरांमध्ये 0.05 टक्क्यांची कपात केली आहे. या कपातीमुळे बँकेच्या कर्जाचा व्याजदर 8.55 टक्क्यांवरुन 8.50 टक्क्यांवर आला आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. नोव्हेंबर 2017 नंतर एसबीआयने पहिल्यांदा व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयने ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फण्डिंग बेस्ड लेंडिंग रेट’ म्हणजेच ‘एमसीएलआर’ आधारित व्याजदरात ही कपात केली आहे. त्यामुळे […]
मुंबई : भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) कर्जांवरील व्याजदरांमध्ये 0.05 टक्क्यांची कपात केली आहे. या कपातीमुळे बँकेच्या कर्जाचा व्याजदर 8.55 टक्क्यांवरुन 8.50 टक्क्यांवर आला आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. नोव्हेंबर 2017 नंतर एसबीआयने पहिल्यांदा व्याजदरात कपात केली आहे. एसबीआयने ‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फण्डिंग बेस्ड लेंडिंग रेट’ म्हणजेच ‘एमसीएलआर’ आधारित व्याजदरात ही कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्जदारांना फायदा होणार आहे. यापूर्वी अनेक बँकांनी आपल्या व्याजदरांत कपात केल्याचं जाहीर केलं होतं.
एसबीआयने 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजदरात 0.10 टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे 30 लाख रुपयांपेक्षा कमी गृहकर्जांवरील नवा व्याजदर 8.60 ते 8.90 टक्के असेल जो आता 8.70 ते 9 टक्के आहे. तसेच बँकेच्या कर्जाला रेपो रेटसोबतही लिंक करण्यात आले आहे. त्यामुळे एसबीआयने सेव्हिंग रेटमध्येही बदल केला आहे. 1 लाख रुपयांपर्यंतच्या बॅलेंसवर आता 3.50 टक्के व्याज मिळणार आहे. तर एक लाखाहून अधिक बॅलेंसवर 3.25 टक्के व्याज मिळणार आहे. हे नवे दर 1 मे 2019 पासून लागू होणार आहेत.
एसबीआयने तब्बल 17 महिन्यांनंतर व्याजदरांत कपात केली आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2017मध्ये एसबीआयने एमसीएलआरमध्ये 0.05 टक्क्यांची कपात केली होती. यापूर्वी एचडीएफसी बँकेने कर्जावरील व्याजदरात 0.10 टक्क्यांची कपात केली होती. तर, महाराष्ट्र बँकेने 0.05 टक्क्यांची कपात केली होती. महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेनेही रेपो रेटमध्ये कमी केला होता.