स्टेट बँकेची मोठी चूक, पासवर्ड न टाकल्याने खातेदारांचा डेटा लीक
मुंबई: स्टेट बँकेत (State Bank of India ) खातं असणाऱ्या ग्राहकांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या ग्राहकांची माहिती लीक झाल्याची भीती आहे. बँक बॅलेन्स, खाते क्रमांकासह वैयक्तिक आणि महत्त्वाची माहिती लीक झाल्याचा संशय आहे. टेकक्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, बँकेने सर्व्हरचा पासवर्ड टाकण्यास विसरल्यामुळे ग्राहकांची माहिती लीक झाल्याची भीती आहे. रिपोर्टनुसार, […]
मुंबई: स्टेट बँकेत (State Bank of India ) खातं असणाऱ्या ग्राहकांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयच्या ग्राहकांची माहिती लीक झाल्याची भीती आहे. बँक बॅलेन्स, खाते क्रमांकासह वैयक्तिक आणि महत्त्वाची माहिती लीक झाल्याचा संशय आहे. टेकक्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, बँकेने सर्व्हरचा पासवर्ड टाकण्यास विसरल्यामुळे ग्राहकांची माहिती लीक झाल्याची भीती आहे.
रिपोर्टनुसार, सुरक्षा नसलेला हा सर्व्हर बँकेच्या SBI Quick सेवेचा भाग होता. SBI Quick – MISSED CALL BANKING ही मोफत सेवा आहे. ग्राहक बॅलेन्स, मिनी स्टेटमेंट आणि इतर माहिती आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन एसएमएस किंवा मिस कॉल देऊन मिळवू शकतात.
SBI Quick सेवा थेट ग्राहकांच्या मोबाईल फोनशी संलग्न असल्याने, सर्व्हरमधून लीक झालेला डाटा वापरत खात्यातील पैशांची अफरातफर होण्याची भीती आहे.
Techcrunch च्या रिपोर्टनुसार स्टेट बँकेला एका रिसर्चरने याबाबतची सूचना दिली होती. त्यानंतर चौकशी केली असता, बँकेचा सर्व्हर पासवर्डविनाच असल्याचं आढळून आलं. त्यामुळेच व्यक्तीगत डाटा लीक होण्याची भीती आहे.
सध्या तरी हा सर्व्हर कधीपासून विनापासवर्ड आहे हे कळू शकलेलं नाही. बँकेनेही याबाबत माहिती दिलेली नाही. या सर्व्हरवरुन खातेदारांना मेसेज पाठवले जाऊ शकतात. सोमवारीच बँकेने जवळपास 30 लाख मेसेज पाठवले होते. या सर्व्हरद्वारेच खातेदारांना पाठवण्यात आलेले महिनाभरातील मेसेज वाचू शकतात.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. कोट्यवधी नागरिकांची या बँकेत खाती आहेत. त्यामुळे या खातेदारांच्या सुरक्षेशी खेळ महागात पडू शकतो.