Multibagger Penny Share : या शेअरने एक लाखांचे केले 2.46 कोटी, पेनी शेअरने दिला असा तगडा रिटर्न

  Multibagger Penny Share : या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला, किती मिळाला परतावा?

Multibagger Penny Share : या शेअरने एक लाखांचे केले 2.46 कोटी, पेनी शेअरने दिला असा तगडा रिटर्न
जोरदार परतावा
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 10:18 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) अनेक जण कमाई करतात. गेल्या वर्षभरापासून बाजारात चढउतार सुरु आहे. बाजारात घसरणीचे सत्र असले तरी आणि बाजाराने गुंतवणूकदारांना (Investors) नाराज केले असले तरी काही शेअर्सनी दमदार कामगिरी बजावली आहे. या स्टॉक्सनी तगडा रिटर्न (Good Return) दिला आहे. गेल्या दोन वर्षात गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न देणारे अनेक स्टॉक्स आहेत. तर काही पेनी शेअरने जोरदार कामगिरी बजावली आहे. 10 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे स्टॉक गुंतवणूकदारांना मिळाले आणि आज त्यांना कोट्यवधीचा फायदा झाला.

शेअर बाजार हा जोखमीचा व्यवहार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास करावा. तज्ज्ञांच्या सल्ला घ्यावा. आंधळी कोशिंबीर सारखा हा खेळ नाही. त्यामुळे कंपन्यांचा योग्य अभ्यास, त्यांची माहिती घेतल्याशिवाय शेअरमध्ये गुंतवणूक करु नका.

तर एसईएल उत्पादक कंपनीने (SEL Manufacturing Company) गुंतवणूकदारांना एक लाख रुपयांचा 2.46 कोटी रुपयांचा परतावा दिला. एप्रिल 2022 मध्ये NSE वर हा शेअर 1975.80 प्रति रुपये या उच्चांकी पातळीवर पोहचला. गेल्या सहा महिन्यांत एनएसईवर स्मॉल कॅप स्टॉकमध्ये 40 टक्के घसरण दिसून आली.

हे सुद्धा वाचा

गेल्या सहा महिन्यात हा शेअर 40 टक्के घसरुनही मल्टिबॅगर ठरला. गेल्या दोन वर्षात मल्टिबॅगर स्टॉकमधील हा पेनी स्टॉक आहे. हा शेअर 2.25 रुपयांनी वाढून 554.10 प्रति शेअरवर पोहचला. या शेअरने गुंतवणूकदारांना मालमाल केले.

या स्टॉकने त्यांच्या शेअरधारकांना जोरदार रिटर्न दिला. गेल्या एका महिन्यात या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये जवळपास 15 टक्के घसरण झाली. गेल्या सहा महिन्यात हा मल्टिबॅगर स्टॉक जवळपास 925 रुपयांहून 554 रुपयांवर घसरला. यामध्ये 40 टक्क्यांची घसरण दिसून आली.

गेल्या सहा महिन्यात 40 टक्के घसरुनही या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदा फायदा मिळवून दिला. या शेअरने गेल्या वर्षात जवळपास 750 टक्के रिटर्न दिला आहे. 15 जानेवारी 2021 रोजी हा पेनी शेअर एनएसईवर 2.25 रुपयांवर होता. सध्या या शेअरचा भाव 554 रुपये होता. या शेअरने दोन वर्षांत 24,500 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.