ज्येष्ठ नागरिकांना बँकाकडून मोठं गिफ्ट, व्याजाचा फायदा वाढला, पाहा यादी

बँकांनी ज्येष्ठ नागरिकांना विशेष मुदत ठेव योजना अर्थात स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट स्कीमवर (FD) 30 जूनपर्यंत अधिक व्याज देणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना बँकाकडून मोठं गिफ्ट, व्याजाचा फायदा वाढला, पाहा यादी
Rupee Notes
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 12:17 PM

मुंबई : देशातील मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांनी ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens savings scheme ) भेट दिली आहे. बँकांनी ज्येष्ठ नागरिकांना विशेष मुदत ठेव योजना अर्थात स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट स्कीमवर (FD) 30 जूनपर्यंत अधिक व्याज देणार आहे. कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic) काळात ही योजना सुरु करण्यात आली होती. व्याजदर कोसळत असल्याने ही विशेष योजना आणली होती. या योजनेची मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या नियमित मुदत ठेवी आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉईंट व्याज देते. मात्र ही विशेष मुदत ठेव आहे, त्यामुळे रिन्यू डिपॉझिट्सवरही ही लागू आहे. (Senior citizens gets more fd interest rates till 30 june 2021 by SBI HDFC and other banks)

भारतीय स्टेट बँक (SBI), एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) यासारख्या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त मुदतीच्या विशेष एफडी स्कीम 30 जून 2021 पर्यंत मुदवाढ दिली आहे.

कोणत्या बँका ज्येष्ठ नागरिकांना विशेष मुदती ठेवींवर किती व्याज देतं?

SBI स्पेशल FD स्कीम

स्टेट बँक ऑफ इंडियाने मागील वर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी वीकेअर (SBI WECARE) ही टर्म डिपॉझिट योजना सुरु केली होती. या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींवर नियमित व्याजाच्या 0.80 टक्के जास्त व्याज मिळणार आहे. सध्या 5 वर्षांच्या एफडीवर 5.40 टक्के व्याज मिळतं, मात्र या योजनेनुसार हा व्याजदर 6.20 टक्के असेल.

HDFC बँक 

HDFC बँकेने 0.25 टक्के अतिरिक्त व्याज योजना सुरु केली. सध्या ज्येष्ठ नागरिकांना मिळत असलेल्या 0.50 टक्के प्रीमियमपेक्षा जास्त आहे. ही योजना 5 ते 10 वर्षे मुदत ठेवींसाठी आहे. HDFC बँक सीनियर सिटीजन केयर FD मध्ये मिळणारा व्याजदर 6.25 टक्के इतका आहे.

ICICI बँक गोल्डन इयर्स FD

ICICI बँकेने गोल्डन इयर्स FD स्कीम आणली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या FD वर सध्या मिळत असलेल्या 0.50 टक्के व्याजदरावर अतिरिक्त 0.30 टक्के व्याजदराची ऑफर दिली आहे. त्यामुळे या खास योजनेअंतर्गत FD वर 6.30 टक्के व्याज मिळते.

BOB स्पेशल FD

बँक ऑफ बडोदाने (BOB) ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 100 BPS अधिक व्याज देऊ केलं आहे. त्यानुसार या बँकेच्या ग्राहकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर 6.25 % व्याजदर दिला जात आहे. याचाही कालावधी 5 ते 10 वर्ष आहे.

संबंधित बातम्या 

Gold Price Today | चार दिवसांत तिसऱ्यांदा घसरले सोन्याचे भाव, जाणून घ्या आजचा नवा दर

सावधान, कोरोना काळात ‘हा’ एक SMS तुमचं बँक अकाऊंट रिकामं करु शकतो, SBI चा इशारा

(Senior citizens gets more fd interest rates till 30 june 2021 by SBI HDFC and other banks)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.