Sensex-Nifty Double : सेन्सेक्स-निफ्टी येत्या 5 वर्षांत दुप्पट! मार्केट गुरु रामदेव अग्रवाल यांनी का दिला ‘स्टार’
Sensex-Nifty Double : सेन्सेक्स आणि निफ्टीची गेल्या महिन्यापासून घौडदोड सुरु आहे. 61,000 अंकाहून सेन्सेक्सने 66,000 अंकी झेप घेतली आहे. निफ्टीची पण आगेकूच सुरु आहे. पण येत्या पाच वर्षांत हे दोन्ही इंडेक्स खरंच डब्बल होतील?
नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : एनएसई निफ्टी (NSE Nifty) 40,000 आणि बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) 1 लाखांच्या पुढे गेले तर? तुम्ही म्हणाल काय बाजारगप्पा मारताय राव. एक गोष्ट नक्की की हा शेअर बाजाराविषयीचा (Share Market) अंदाज आहे. त्यात बाजार गप्पा किती आहेत, हे येणारा काळच ठरवेल. पण ज्या व्यक्तींना शेअर बाजाराची नस माहिती आहे, अशा वैद्यानेच हा अंदाज वर्तवला असेल तर त्यावर चर्चे झडल्याशिवाय कशी राहील, नाही का? सेन्सेक्स आणि निफ्टीची गेल्या महिन्यापासून घौडदोड सुरु आहे. 61,000 अंकाहून सेन्सेक्सने 66,000 अंकी झेप घेतली आहे. निफ्टीची पण आगेकूच सुरु आहे. निफ्टी 15,000, 17000 आणि आता 20,000 या टप्प्यावर येऊन धडकला आहे. पण येत्या पाच वर्षांत हे दोन्ही इंडेक्स खरंच डब्बल होतील?
पाच वर्षांत गगन भरारी
येत्या पाच वर्षांत निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जोरदार तेजी दिसून येईल. हे दोन्ही निर्देशांक दुप्पट होतील, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. मोतीलाल ओसवाल फायनेन्शिअल सर्व्हिसेजचे रामदेव अग्रवाल यांनी सीएनबीसी टीव्ही 18 सोबत बोलताना हा अंदाज वर्तवला आहे.
राहा सतर्क
बाजार हा मायाजाल आहे. तेव्हा दुकान उघडे आहे, म्हणून कोणत्याही दुकानातून काहीही खरेदी करु नका. बाजारात अप-डाऊन सुरु आहे. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत, शेअरविषयीचे संशोधन करत नाहीत. तोपर्यंत खरेदी करण्याची घाई करु नका, असा सल्ला त्यांनी दिला.
बाजाराची घौडदोड
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांक जुलै 2018 मध्ये 37,550 अंकाच्या स्तरावर होता. यावर्षी जून महिन्याच्या अंतिम टप्प्यात तो 61,000 ते 62,000 अंकावर पोहचला. यामध्ये तेजीचे सत्र आहे. सध्या निर्देशांक 66,000 अंकावर पोहचला आहे. त्याने 77 टक्क्यांची चढाई केली आहे.
परदेशी गुंतवणूकदारांची भाऊगर्दी
भारतीय शेअर बाजारात सध्या परदेशी गुंतवूकदारांची गर्दी उसळली आहे. NSDL च्या आकडेवारीनुसार, 18 जुलैपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये 34,444 कोटी रुपये गुंतवले. सलग पाचव्या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारावर विश्वास दाखवला आहे. 2023 पर्यंत परदेशी पाहुण्यांनी 1.10 लाख कोटींची गुंतवणूक केली. तर जानेवारी आणि फेब्रुवारीत त्यांनी पैसा काढला होता. जानेवारीत 28,852 कोटी आणि फेब्रुवारीत 5,294 कोटी रुपये बाजारातून काढण्यात आले.
अमेरिकेतील बाजार तेजीत
परदेशी बाजाराने उसळी घेतली आहे. त्याचा भारतीय बाजाराला फायदा होत आहे. डाऊ जोंस गेल्या एका महिन्यापासून 2.50 टक्के तेजीसह वधारला. तर गेल्या 6 महिन्यात त्यात जवळपास 6 टक्क्यांची तेजी दिसून आली. S&P 500 हा निर्देशांक गेल्या 6 महिन्यात 17 टक्क्यांची तेजी दिसून आली.