Stock Market Update: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 443 अंकांनी वधारला, ‘रिलायन्स’च्या गुंतवणुकदारांची निराशा
आजच्या व्यवहारादरम्यान IT शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. निफ्टी वर IT इंडेक्स 1.5 टक्क्यांनी बळकट झाला. माईंडट्री, टीसीएस, विप्रो, एचसीएलटेक, इन्फोसिस आणि टेक-एम मध्ये 1 टक्के ते 2.5 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली.
नवी दिल्ली- जागतिक अर्थकारणातील घडामोडींचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Indian Share Market) दिसून आले. आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही इंडेक्समध्ये तेजी नोंदविली गेली. सेन्सेक्स मध्ये 400 हून अधिक अंकांची तेजी राहिली. तर निफ्टी 15550 च्या टप्प्यावर पोहोचला. आयटी व ऑटो शेअर्समध्ये (Auto Shares) खरेदीचा जोर कायम राहिला. निफ्टी वर 2 टक्के व 4 टक्के अनुक्रमे वधारले. रियल्टी इंडेक्स 1.5 टक्क्यांनी बळकट झाला. एफएमसीजी, मेटल आणि फार्मा सहित अन्य प्रमुख इंडेक्स वधारणीसह बंद झाले. सेन्सेक्स (sensex) 443 अंकांच्या तेजीसह 52,265.72 च्या टप्प्यावर बंद झाला. निफ्टी 143 अंकांच्या वाढीसह 15557 च्या स्तरावर पोहोचला. सेन्सेक्स वर 30 पैकी 26 शेअर मध्ये तेजी राहिले.
वधारले की घसरले
आजच्या वधारणीच्या शेअर्समध्ये मारुती MARUTI, एम अँड एम M&M, भारती एअरटेल BHARTIARTL, टीसीएस TCS आणि विप्रो WIPRO समावेश झाला. तर रिलायन्स RELIANCE सर्वाधिक घसरणीचा स्टॉक ठरला.
IT शेअर्समध्ये खरेदी
आजच्या व्यवहारादरम्यान IT शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. निफ्टी वर IT इंडेक्स 1.5 टक्क्यांनी बळकट झाला. माईंडट्री, टीसीएस, विप्रो, एचसीएलटेक, इन्फोसिस आणि टेक-एम मध्ये 1 टक्के ते 2.5 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली.
स्टॉक एक्स्चेंजवर बंदी
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर एफ अँड ओ च्या अंतर्गत तीन शेअर्सच्या ट्रेंडिंगवर बंदी घालण्यात आली होती. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, आरबीएलआणि सन टीव्ही नेटवर्क स्टॉक्स साठी व्यवहार झाले नाही.
FII आणि DII आकडेवारी
काल (बुधवार) 22 जूनच्या व्यवहारादरम्यान एफआयआय आणि डीआयआयची आकडेवारी समोर आली आहे. फॉरेन इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्स यांनी (FIIs) शेअर बाजारातून 2920.61 कोटी रुपये काढून घेतले. तर यादरम्यान डोमेस्टिक इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्स यांनी (DIIs) शेअर बाजारात 1859.07 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
क्रूड तेलाचे पडसाद
कच्च्या तेलाच्या किंमतीमधील तेजी-घसरणीचा शेअर बाजारावर परिणाम होतो. आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे भाव घसरणीसह 109 डॉलर प्रति बॅरल वर पोहोचले. अमेरिकी क्रूडचा भाव 104 डॉलर प्रति बॅरल वर आहे. अमेरिकेत 10 वर्षांची बॉन्ड यील्ड 3.158 टक्क्यांवर आहे.