कोरोना लसीच्या निर्मितीनं तिजोरी भरली, सीरम आणि भारत बायोटेकला 15 हजार कोटींचा नफा
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सध्या सुरू आहे. Serum Institute Bharat Biotech
नवी दिल्ली: भारतात सध्या कोरोनाविषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सध्या सुरू आहे. आता 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील कोरोनाची लस दिली जात आहे. भारतात सध्या भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या दोन कंपन्या लस उत्पादित करतात. भारत बायोटेक कोवॅक्सिन तर सीरम इन्स्टिट्यूट कोविशील्ड लसीचं उत्पादन करते. कोरोना लस बनवणाऱ्या दोन कंपन्यांना आत्तापर्यंत तब्बल 15 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.(Serum Institute of India and Bharat Biotech to get bulk of Rs 15000 crore profit due to production of corona Vaccine )
18 कोटी डोसद्वारे लसीकरण
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत 18 कोटी 70 लाख 99 हजार 792 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. बुधवारी देशात 11 लाख 66 हजार 90 डोस देण्यात आले. आत्तापर्यंत 14 कोटी 46 लाख 23 हजार 670 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 4 कोटी 23 लाख 86 हजार 122 लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत
जुलैअखेरपर्यंत 51.6 कोटी डोस मिळणार
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलेल्या माहितीनुसार जुलै पर्यंत भारतात 51.6 कोटी डोस उपलब्ध होतील. वाढलेली लसीची मागणी लक्षात घेता कोरोना लसींचं उत्पादन देखील वाढवलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं.
भारतात सध्या तीन कोरोना लसी उपलब्ध
भारतात सध्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि रशियाच्या स्पुतनिक वी या तीन लसी उपलब्ध आहेत. पुढील काळात झायडस कॅडीला, सीरमची नोवावॅक्स आणि भारत बायोटेकची नोझल वॅक्सिन आणि जेनोवो एमआरएनएची लस यांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारत सरकारचा डिसेंबर पर्यंत देशवासियांना २१६ कोटी लसी उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे.
भारतात सध्या कोरोना लसीचे दर किती
भारतामध्ये साीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेक कोवॅक्सिन या दोन लसी केंद्र सरकारला 150 रुपयांना दिल्या जात आहेत. तर, सीरमॉची लस राज्य सरकारांना 300 आणि खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना विकली जात आहे. दुसरीकडे, भारत बायोटेकची लस राज्य सरकारांना 400 आणि खासगी रुग्णालयांना 1200 रुपयाला विकली जात आहे. तर, स्पुतनिक वी लस डॉ. रेड्डीज लॅबोरटरीज तर्फे 995 रुपयांना विकली जात आहे.
PM Narendra Modi Live | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद#PMModi | #CoronavirusIndia https://t.co/sjWf1NUM8k
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021
संबंधित बातम्या:
लसीसाठी तरतूद केलेले 35 हजार कोटी गेले कुठे? राज्यांवर लसींचा बोजा का?
(Serum Institute of India and Bharat Biotech to get bulk of Rs 15000 crore profit due to production of corona Vaccine)