Banking Charges : ग्राहकांच्या जीवावर बँका मालामाल, पाच वर्षांत इतक्या हजार कोटींचा फायदा
Banking Charges : ग्राहकांच्या जीवावर बँकांनी मोठी कमाई केली. सेवा शुल्क, दंडाच्या माध्यमातून बँकांना मोठा फायदा झाला. गेल्या पाच वर्षांत हजार कोटी रुपयांची कमाई त्यांना झाली.
नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : ग्राहकांच्या जीवावर बँकांनी मोठी कमाई केली. सेवा शुल्क, दंडाच्या (Banking Charges ) माध्यमातून बँकांना मोठा फायदा झाला. 2018 नंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी बँकामध्ये कमीतकमी शिल्लक, बॅलन्स न ठेवल्याचा फटका ग्राहकांना बसला. एटीएम व्यवहार आणि SMS सेवेच्या नावाखाली बँकांनी मोठी कमाई केली. गेल्या पाच वर्षांत बँकांनी हजार कोटींची कमाई केली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी याविषयीची माहिती राज्यसभेत दिली. सेवा शुल्क आणि दंडाच्या रक्कमेतून बँकांना मोठा फायदा झाला आहे. याविषयीची आकडेवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड यांनी दिली.
किती झाला फायदा
2018 नंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी बँकांना मोठा फायदा झाला. कमीतकमी शिल्लक, बॅलन्स न ठेवल्याचा फटका ग्राहकांना बसला. एटीएम व्यवहार आणि SMS सेवेच्या नावाखाली बँकांनी मोठी कमाई केली. गेल्या पाच वर्षांत 35,587 कोटी रुपयांची कमाई बँकांनी केली.
शिल्लक नसेल तर दंड
राज्यसभेतील खासदार अमी याग्निक यांनी प्रश्नकाळात याविषयीचा सवाल विचारला होता. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी याविषयीची माहिती दिली. बँकांनी 2018 पासून मिनिमम बँलेन्स न ठेवल्याने दंड वसूल केला. त्यातून 21,044.04 कोटी रुपये वसूल केले.
इतर सेवांचा फायदा
एटीएमवर खातेधारकांना निश्चित मोफत व्यवहार तर दिलाच आहे. पण अतिरिक्त व्यवहारासाठी शुल्क लावण्यात येते. त्या माध्यमातून बँकांना 8289.32 कोटी रुपयांची वसूली झाली. तर एसएमएस सेवेच्या माध्यमातून बँकांनी 6254.32 कोटींची वसूली केली.
बँकिंग सेवा गरिबांसाठी
बँका गरिबांकडून छोट्या छोट्या गोष्टींसाठी सेवा शुल्क आकारतात, त्याविषयी सरकार काही करणार का? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर उत्तर देण्यात आले. आरबीआयने देशातील गरीब कुटुंबांना बँकिंग सेवा देण्यासाठी पाऊलं टाकल्याची माहिती त्यांनी दिली. बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाऊंट (BSBDA) वर काम सुरु आहे. पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत अनेक खाते उघडण्यात आले आहेत. त्यात कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. या खात्यात कमीतकमी बँलन्स ठेवण्याची गरज नाही.
दंड वसुलीस परवानगी
भागवत कराड यांनी 1 जुलै 2015 रोजीचे एका परिपत्रकाची माहिती दिली. त्यात ग्राहक सेवेच्या आधारे आरबीआयच्या मास्टर सर्क्युलरमध्ये कमीत कमी बँलन्स नसल्यास बँकांना दंड वसुलीस परवानगी देण्यात आली. पण अव्वाच्या सव्वा दंड वसूल करता येणार नाही.
एटीएमचा नियम काय
10 जून 2021 रोजी आरबीआयचे परिपत्रकात बँकेच्या ग्राहकांना महिन्यात पाच व्यवहार मोफत करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय दुसऱ्या बँकाच्या एटीएममधून सेवेस काय नियमांआधारे परवानगी देण्यात आली. मेट्रो शहरात इतर बँकांच्या तीन आणि नॉन मेट्रो शहरात 5 व्यवहार मोफत करण्यात आले. याशिवाय 1 जानेवारी 2022 रोजीपासून एका अतिरिक्त व्यवहारासाठी ग्राहकांकडून 21 रुपयांचे शुल्क आकारायला सुरुवात केली आहे.