Share Market close Update: बाजाराचा आज निगेटीव्ह सूर, सुरुवात आणि शेवट ही घसरणीने, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मात्र संधी
Market Closing Bell: ब्लॅक मंडेच्या फटक्यातून बाजार काही सावरला नाही. बाजाराचा निगेटिव्ह सूर आज ही कायम होता. बाजाराची सुरुवात आणि शेवट घसरणीनेच झाला. मध्यंतरात बाजार स्थिर होता. दीर्घकालीन गुंतवणुकदारांना गुंतवणुकीसाठी ही संधी आहे.
भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) गेला आठवडा बरा म्हणावा अशी अवस्था या आठवड्याच्या सुरुवातीलाच झाली. आता दोन दिवस उरले आहेत. परंतु ब्लॅक मंडेच्या (Black Monday) धक्क्यातून बाजार सावरला नाही. बाजाराची आजची सुरुवात घसरणीने झाली. तेव्हाचा गुंतवणुकदारांच्या काळजाचा ठोका चुकला. बाजाराचा रोख लक्षात आल्यानंतर दीर्घकालीन गुंतवणुकदारांशिवाय इतरांनी बाजारापासून दूर राहणे पसंत केले. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकात (BSE) 134 अंकांची घसरण झाली तर निफ्टी निर्देशांकात (Nifty Sensex) 32 अंकांची घसरण झाली आहे.सेन्सेक्समध्ये 0.25 टक्क्यांची घसरण होऊन तो 53,026 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 0.21 टक्क्यांनी घसरण होऊन तो 15,799 अंकांवर पोहचला. आज सुरुवातीच्या सत्रात बाजाराची सुरुवात पडझडीने झाली. निर्देशांकाने निगेटीव्ह टर्न (Negative Turn) घेतला. त्यानंतर दुपारी बाजार स्थिरावला. बँकिंग, आयटी, एमएमसीजी या क्षेत्रातल्या शेर्असे खराब कामगिरी केल्याने बाजारात घसरणीकडे गेला. मेटल, ऑटो, ऑईल अन्ड गॅस, उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्सने बाजाराला आधार दिला. निफ्टीतील 16 शेअर्समध्ये वाढ झाली तर 34 शेअर्समध्ये घसरण झाली.
सुरुवातीलाच स्पीड ब्रेकर
आज शेअर बाजारात सुरुवातीलाच गुंतवणुकदारांना स्पीड ब्रेकर लागला. बाजारात आणखी एका सत्रासाठी अस्थिर झाला. पहिल्या सत्रात बाजारात सेन्सेक्स 554.30 अंकानी लुडकला. तर निफ्टी 50 शेअर 148.50 अंकांच्या घसरणीसह 15,701 अंकांवर उघडला. सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास निर्देशांक 293 अंकांच्या घसरणीसह 52,885.71 अंकांवर व्यवहार करत होता.निफ्टीत ही याचवेळी घसरणीचे सत्र सुरु होते. आणि जवळपास अर्धा टक्का घसरला. कमकुवत जागतिक संकेत सुरुवातीच्या व्यापारातील भावनेवर तोलत होते ज्यामुळे गॅप-डाउन सुरुवात झाली. शेवटी, निफ्टी निर्देशांक 0.4% ने घसरून 15,799 स्तरावर बंद झाला.बँकिंग,आयटी आणि इतर शेअरमध्ये गुंतवणुकदारांना नुकसान झाले. तर तेल, गॅस, रियाल्टी आणि ऑटो क्षेत्राने अशा ही परिस्थितीत ग्राहकांना दिलासा दिला. निर्देशांकाने प्रत्येकी अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरण झाली. HDFC Life, HUL, Apollo Hospitals, Axis Bank, Tata Consumer Products, Bajaj FinServ, आणि UPL या शेअर्सनी आज कच खाल्ली. हे शेअर्स 4.5% पर्यंत खाली आले.बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक ही कामगिरी बजावू शकले नाहीत. निफ्टी आयटी, निफ्टी बँक आणि एफएमसीजी निर्देशांक प्रत्येकी 1% पेक्षा जास्त घसरले.
रुपयाची निचांकी घसरण
इंटरबँक करन्सी एक्सचेंज मार्केटमध्ये मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 15 पैशांनी घसरला आणि 78.51 रुपयांवर उघडला. परंतु, परदेशी गुंतवणुकदारांनी जोरदार विक्री सुरु केल्याने रुपयाची ऐतिहासिक घसरगुंडी उडाली. मंगळवारी रुपया 78.77 रुपयांच्या घसरणीवर पोहचला. बुधवारी ही घसरण सुरुच होती. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 78.97 इतकी आहे.