Share Market Crash | ‘पनौती’ ठरले हे शेअर! बाजाराला घातले खड्ड्यात, हवालदिल गुंतवणूकदार

Share Market Crash | सोमवारी शेअर बाजार आपटला होता. मंगळवारी दिलासा देत, बुधवारी बाजाराने पुन्हा रंग दाखवला. शेअर बाजारात त्सुनामी आली. Sensex दणकावून आपटला. शेअर बाजारातील 20 स्टॉक पनौती ठरले. या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधीचे नुकसान केले.

Share Market Crash | 'पनौती' ठरले हे शेअर! बाजाराला घातले खड्ड्यात, हवालदिल गुंतवणूकदार
बाजाराने डाव पालटला एका तासात
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 2:22 PM

नवी दिल्ली | 13 March 2024 : शेअर बाजारात सध्या सर्वच काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. नवनवीन उच्चांक गाठणार शेअर बाजार अचानक अचके देत आहे. अनेक शेअर आज बाजाराच्या पिचवर टिकले नाहीत. काहींना तर खाते सुद्धा उघडता आले नाही. या पनौती शेअरने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान केले. सोमवारी शेअर बाजार आपटला होता. मंगळवारी थोडा दिलासा मिळाला. बुधवारी शेअर बाजार पुन्हा दणकावून आपटला. Sensex 700 अंकांनी गडगडला.

तेजीनंतर बाजार गडगडला

आज सकाळी बाजारात तेजीचे सत्र होते. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बाजारात अचानक घसरण सुरु झाली. बाजार उघडला तेव्हा 1281 शेअरमध्ये तेजीचे सत्र होते. तर 948 शेअर घसरले होते. पाहता पाहता सेन्सेक्स 600 अंक, निफ्टी 200 अंकांनी आपटला. Paytm पासून तर बाजारातील दिग्गजांपर्यंत सर्वच हतबल दिसले. बाजारातील पडझडीसाठी हे 20 शेअर कारणीभूत ठरले.

हे सुद्धा वाचा

अदानीचे शेअर घसरले

शेअर बाजारात घसरण होत असताना दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील अनेक शेअर आपटले. अदानी ग्रीन एनर्जी जवळपास 9 टक्के, अदानी टोटल गॅस 7 टक्के, अदानी इंटरप्राईजेस 6 टक्के, अदानी विल्मर 4 टक्के, अदानी पोर्ट 5 टक्के, अदानी ग्रीन सोल्यूशन्स 4.5 टक्के आणि अदानी पॉवर 5 टक्क्यांनी घसरला.

हे शेअर आपटले

अदानी कंपन्यांच्या शेअर्ससह IRFC 8%, NHPC 8%, Voda-Idea 7.5%, HAL 7%, RVNL 7%, Power Grid 6%, LIC 5.5%, Paytm 5%, Coal India 4%, NGC 4.5%, Tata Power 4.5%, IRCTC 4%, NTPC 5.5% घसरले. गुंतवणूकदारांचे या शेअर्सने नुकसान केले.

सोमवारी पण दणआपट

या आठवड्याच्या पहिल्या व्यापारी सत्रात, सोमवारी शेअर बाजारात घसरण आली होती. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक 616 अंकांनी घसरला होता. तो 73,502 अंकावर बंद झाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 160 अंकांनी घसरला होता. तो 22,332 अंकांवर बंद झाला होता. मंगळवारी बाजार स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात दिसून आला. तर बुधवारी पुन्हा बाजाराची विकेट पडली.

का घसरला बाजार

नफ्याच्या हव्यासाने बाजाराला जेरीस आणले. अवघ्या एका तासातच डाव पलटला. नफा मिळविण्याच्या हव्यासाने बाजारात गुंतवणूकदार बिथरले. विक्रीचे सत्र सुरु झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सने विश्वास गमावला. बाजारात पडझड सुरु झाली. या दोन्ही सेगमेंटमध्ये 3 टक्क्यांपर्यंत घसरणीची नोंद झाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.